विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत आणि भूतान यांच्यातील पहिल्याच क्रॉस-बॉर्डर रेल्वे प्रकल्पाला हिरवा कंदील देण्यात आला आहे. केंद्र सरकारने 4,033 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली असून तो “मेक इन इंडिया” उपक्रमाचा भाग आहे. India-Bhutan
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी प्रकल्पाचे तपशील उलगडले. दोन मार्ग उभारले जाणार आहेत: बनरहाट (प. बंगाल) – सामत्से (भूतान) : 20 किमी, खर्च 577 कोटी रुपये. कोकराझार (आसाम) – गेव्हल्फू (भूतान) : 69 किमी, खर्च 3,456 कोटी रुपये..दोन्ही मार्गांवर वंदे भारत सारख्या इलेक्ट्रिक ट्रेन धावतील.
प्रकल्पाची एकूण लांबी: 89 किमी असून बनरहाट-सामत्से लाईन : 2 स्थानके, 25 पूल, 1 मोठा फ्लायओव्हर, 24 लहान फ्लायओव्हर, 37 अंडरपास. कोकराझार-गेव्हल्फू लाईन : 6 स्थानके, 29 मोठे पूल, 65 छोटे पूल, 2 व्हायाडक्ट, 1 फ्लायओव्हर, 39 अंडरपास. सर्व कोचेस आणि तंत्रज्ञान भारतातच विकसित केले जाईल
भूतानला भारताच्या 1.5 लाख किमी रेल्वे नेटवर्कला थेट प्रवेश मिळणार आहे. यामुळे व्यापाराला गती मिळेल आणि भूतानच्या लोकांना जागतिक नेटवर्कशी सहज जोडणी मिळेल.
हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या वर्षीच्या भूतान भेटीतील समझौता कराराचा परिणाम आहे. या निमित्ताने भारत-भूतान संबंध नवे पर्व सुरू करत आहेत.
India-Bhutan historic railway project begins
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!




















