विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Piyush Goyal अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला “डेड इकॉनॉमी” (मृत अर्थव्यवस्था) म्हणत टीका केल्यानंतर, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी स्पष्ट केले की, “भारत सध्या जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून, लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल.”Piyush Goyal
गोयल म्हणाले, “गेल्या दशकात भारत ११व्या क्रमांकावरून ५व्या क्रमांकावर पोहोचला आहे. ‘फ्रॅजाईल फाइव्ह’मधून बाहेर पडून आता संपूर्ण जग भारताकडे ‘ब्राईट स्पॉट’ म्हणून पाहत आहे. शेतकरी, MSME, उद्योजक आणि औद्योगिक धोरणांच्या जोरावर भारताने ही कामगिरी साधली आहे.”Piyush Goyal
गोयल यांनी सांगितले की, भारताची सध्या परकीय चलन साठा सुमारे $690 अब्ज इतका आहे आणि महागाईवर नियंत्रण ठेवण्यात यश आले आहे. यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. भारत ६-७% दराने स्थिर आर्थिक वाढ नोंदवत आहे, आणि सरकारचा उद्देश हा वाढ ८% च्या जवळ नेण्याचा आहे.यश
गोयल यांनी नमूद केले की, भारताने संयुक्त अरब अमिरात, यूके, ऑस्ट्रेलिया, EFTA देशांबरोबर महत्त्वाचे मुक्त व्यापार करार (FTA) केले असून, अमेरिका, युरोपियन युनियन आणि न्यूझीलंडसह चालू असलेल्या वाटाघाटी भारताच्या जागतिक व्यापार संबंधांना अधिक मजबुती देतील. यामुळे विक्रमी थेट परकीय गुंतवणूक (FDI) भारतात येण्याची शक्यता आहे.
१ ऑगस्टपासून भारताच्या काही वस्तूंवर अमेरिका २५% आयात शुल्क लावणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना गोयल म्हणाले, “केंद्र सरकारने उद्योग संघटना, निर्यातदार आणि विविध व्यावसायिक प्रतिनिधींशी सल्लामसलत सुरू केली आहे. या परिस्थितीमुळे काय परिणाम होतील, याचा सखोल अभ्यास चालू आहे.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच एका सार्वजनिक वक्तव्यात म्हटले होते की, “मला फरक पडत नाही भारत काय करतो रशियासोबत. ते त्यांची डेड इकॉनॉमी घेऊन बुडू शकतात.” यावर प्रत्युत्तर देताना गोयल यांनी स्पष्ट केले की, “आज जगातील आंतरराष्ट्रीय संस्था, आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ भारताकडे अत्यंत आशेने पाहत आहेत. अशी टीका केवळ राजकीय हेतूंनी प्रेरित आहे.”
India is not a ‘dead economy’, but the fastest growing economy in the world, Piyush Goyal’s reply to Trump
महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान