विशेष प्रतिनिधी
बेंगळुरू : भारत आता अमेरिकेला सर्वाधिक स्मार्टफोन पुरवणारा देश ठरला असून, देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची किंमत तब्बल १२ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे व आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी दिली. smartphones
बेंगळुरूमध्ये मेट्रो प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना वैष्णव यांनी सांगितले की, गेल्या ११ वर्षांत भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात ६ पट वाढ झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमध्येही आठपट वाढ झाली असून, ती आता ३ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाइल फोन उत्पादक देश ठरल्याचेही त्यांनी सांगितले.smartphones
२०१४ मध्ये देशात फक्त २ मोबाइल उत्पादन युनिट्स होत्या, तर आज त्या ३०० हून अधिक झाल्या आहेत. २०१४-१५ मध्ये भारतात विकल्या जाणाऱ्या मोबाइल फोनपैकी फक्त २६ टक्के फोन देशात तयार होत होते, उर्वरित आयात केले जात होते. मात्र, आज ९९.२ टक्के मोबाइल फोन देशातच तयार होतात. मोबाइल उत्पादनाचे मूल्य २०१३-१४ मधील १८,९०० कोटी रुपयांवरून २०२३-२४ मध्ये तब्बल ४,२२,००० कोटी रुपयांवर गेले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी बेंगळुरू येथून तीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यात अजनी (नागपूर)-पुणे वंदे भारत, केएसआर बेंगळुरू-बेळगावी वंदे भारत आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा-अमृतसर वंदे भारतचा समावेश आहे.
India supplies the largest number of smartphones to the US; Electronics production reaches Rs 12 lakh crore
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला