विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. आता भारताने पाकिस्तानमधून थेट आणि अप्रत्यक्ष होणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे. Pakistan
परराष्ट्र व्यापार धोरणात (Foreign Trade Policy – FTP) नव्या तरतुदीचा समावेश करत ही बंदी लागू करण्यात आली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार ही बंदी तत्काळ प्रभावात आली आहे. यानुसार स्पष्ट करण्यात आले आहे की, पाकिस्तानमध्ये उत्पादित किंवा तिथून निर्यात होणाऱ्या कोणत्याही वस्तूंची थेट किंवा अप्रत्यक्ष आयात, त्या वस्तू स्वातंत्र्याने आयात करण्याजोग्या असोत वा नाहीत, ती पूर्णतः बंदी घालण्यात येते. ही बंदी पुढील आदेश येईपर्यंत लागू असेल.भारत सरकारच्या मंजुरीशिवाय कोणत्याही प्रकारचे अपवाद मान्य केला जाणार नाही, असेही या सूचनेत नमूद करण्यात आले आहे.या निर्णयामागे राष्ट्रीय सुरक्षेचा आणि सार्वजनिक धोरणाचा मुद्दा असल्याचे डायरेक्टोरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) ने स्पष्ट केले आहे. Pakistan
त्याचबरोबर भारत सरकारच्या पोर्ट्स, शिपिंग आणि वॉटरवेज मंत्रालयानेही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या ध्वज असलेल्या कोणत्याही जहाजाला भारतीय बंदरांमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे.भारतीय ध्वज असलेल्या जहाजांनाही पाकिस्तानमधील बंदरांवर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.ही बंदी Merchant Shipping Act, 1958 च्या कलम ४११ अंतर्गत लागू करण्यात आली आहे.
मंत्रालयाच्या आदेशानुसार, भारतीय बंदरे, मालवाहतूक आणि संपत्ती यांचे संरक्षण करण्यासाठी ही बंदी आवश्यक आहे. तसेच भारतीय व्यापारी सागरी सेवेचा विकास व देशहित साधण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे.”
India takes major action after Pahalgam terror attack; bans all imports from Pakistan
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती