विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताच्या क्रीडा क्षेत्राला आणखी झळाळी मिळणार आहे. कॉमनवेल्थ स्पोर्टच्या कार्यकारी मंडळाने २०३०च्या शताब्दी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी अहमदाबादची (अमदावद) यजमानपदासाठी शिफारस केली आहे. ही घोषणा बुधवारी करण्यात आली असून, याबाबतचा अंतिम निर्णय नोव्हेंबर २६, २०२५ रोजी ग्लासगो (स्कॉटलंड) येथे होणाऱ्या महासभेत मतदानाद्वारे घेतला जाईल.
या निर्णयामुळे भारताला पुन्हा एकदा जागतिक क्रीडा नकाशावर अग्रस्थानी येण्याची संधी मिळाली आहे. अहमदाबाद आणि नायजेरियातील अबुजा या दोन शहरांनी यजमानपदासाठी अर्ज सादर केले होते. स्पर्धेच्या मूल्यांकन समितीने तांत्रिक तयारी, पायाभूत सुविधा, खेळाडूंची सुविधा, शासकीय पारदर्शकता आणि कॉमनवेल्थच्या मूलभूत मूल्यांच्या आधारे तपासणी केली.
२०३० ची ही राष्ट्रकुल स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण यावर्षी स्पर्धेच्या १०० वर्षांचा शतकपूर्ती सोहळा साजरा होणार आहे. पहिली स्पर्धा १९३० मध्ये कॅनडातील हॅमिल्टन येथे झाली होती.
भारताचा प्रस्ताव ‘विकसित भारत २०४७’ या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी जोडलेला आहे. देशातील विविधता, पायाभूत सुविधा आणि क्रीडा संस्कृतीचे दर्शन या स्पर्धेत घडवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
कॉमनवेल्थ गेम्स असोसिएशन (भारत)च्या अध्यक्षा डॉ. पी. टी. उषा यांनी म्हटले आहे की, अहमदाबादमध्ये २०३० च्या शताब्दी कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन करणे हे भारतासाठी अभिमानास्पद ठरेल. या स्पर्धेमुळे भारताची आयोजन क्षमता, तरुणाईतील प्रेरणा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक दृढ होईल.”
कॉमनवेल्थ स्पोर्टचे कार्यवाहक अध्यक्ष डॉ. डोनाल्ड रुकारे यांनी स्पष्ट केले की, भारताची शिफारस करताना नायजेरियाच्या अबुजाचा प्रस्तावही अत्यंत प्रभावी होता. भविष्यात २०३४ मध्ये आफ्रिकन देशाला यजमानपद देण्याचा विचार केला जाईल.
यापूर्वी ऑगस्ट २०२५ मध्ये केंद्र सरकारने २०३०च्या राष्ट्रकुल स्पर्धांसाठी अर्ज सादर करण्यास मंजुरी दिली होती. तसेच गुजरात सरकारला आवश्यक आर्थिक सहाय्य, क्रीडा मंत्रालय आणि संबंधित खात्यांकडून आवश्यक हमीपत्रे देण्याची परवानगीही देण्यात आली होती.
India to Host 2030 Commonwealth Games! Ahmedabad Chosen for the Centenary Edition
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा