विशेष प्रतिनिधी
रियाध : आयफोन उत्पादनावरून भारत आणि अमेरिकेत जणू अॅपल वॊर सुरु झाले आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांना सांगितले आहे की भारतात कारखाने उभारण्याची गरज नाही. आम्हाला तुमच्या भारतात होणाऱ्या उत्पादनात रस नाही, भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो.
कतारची राजधानी दोहा येथे व्यावसायिक नेत्यांसोबत झालेल्या कार्यक्रमात ट्रम्प यांनी अॅपलच्या सीईओंसोबत झालेल्या संभाषणाची माहिती गुरुवारी दिली. त्यांनी सांगितले की, गुरुवारी आता अमेरिकेत उत्पादन वाढवेल. अॅपल फक्त भारतीय बाजारपेठेला लक्ष्य करण्यासाठी भारतात कारखाना बांधावा. भारताने आम्हाला व्यापारात शून्य शुल्क कराराची ऑफर दिली आहे. भारत आमच्याकडून व्यापारात कोणतेही शुल्क आकारण्यास तयार नाही.अमेरिकेच्या बाजारपेठेत विकले जाणारे ५०% आयफोन भारतात बनवले जातात.
अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, अमेरिकेच्या बाजारपेठेत विकले जाणारे ५०% आयफोन भारतात तयार केले जात आहेत. एप्रिल-जून तिमाहीत अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोनसाठी भारत हा मूळ देश बनेल. त्यांनी सांगितले की एअरपॉड्स, अॅपल वॉच सारखी इतर उत्पादने देखील बहुतेक व्हिएतनाममध्ये तयार केली जात आहेत.चीनच्या तुलनेत कमी दरांमुळे कंपनी भारत आणि व्हिएतनामला प्राधान्य देत आहे. चीनमधील उच्च आयात शुल्काच्या तुलनेत भारत आणि व्हिएतनाममधून आयातीवर फक्त १०% कर आहे.२०२६ पर्यंत, देशात दरवर्षी ६ कोटी+ आयफोन तयार होतील. या वर्षाच्या अखेरीस त्यांची असेंब्ली भारतात हलवली तर २०२६ पासून दरवर्षी येथे ६ कोटींहून अधिक आयफोन तयार होतील. हे सध्याच्या क्षमतेच्या दुप्पट आहे.
आयडीसीच्या मते, २०२४ मध्ये कंपनीच्या जागतिक आयफोन शिपमेंटमध्ये याचा वाटा अंदाजे २८% असेल असा अंदाज होता. अमेरिकेच्या बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या आयफोनचे उत्पादन चीनबाहेर हलवल्याने कंपनीला उच्च शुल्क टाळण्यास मदत होईल.मार्च-२४ ते मार्च-२५ या काळात आयफोन उत्पादनात ६०% वाढ झाली. जगातील प्रत्येक ५ आयफोनपैकी एक आता भारतात तयार केला जात आहे. भारतात, तामिळनाडू आणि कर्नाटकमधील कारखान्यांमध्ये आयफोन तयार केले जातात. फॉक्सकॉन त्याचे सर्वाधिक उत्पादन करते.
India-US Apple War Now! Trump says there is no need to set up factories in India
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?