विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : किंमत मोजावी लागली तरी भारत झुकणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिला आहे.
ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर ५० टक्के आयात कर लादला आहे. जर भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे सुरू ठेवले तर अमेरिका दुय्यम निर्बंध लादण्यास मागेपुढे पाहणार नाही असाही इशारा ट्रम्प यांनी काही तासांपूर्वी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टॅरिफवरुन डोनाल्ड ट्रम्प यांना नाव न घेता प्रत्युत्तर दिलं आहे. मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे, असं पंतप्रधान मोदींनी ठणकावून सांगितले .
नवी दिल्ली येथे एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेला पंतप्रधान संबोधित करताना मोदी म्हणाले, “सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी सतत काम करत आहे. आमच्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत कधीही आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार बंधू-भगिनींच्या हिताशी तडजोड करणार नाही. मला माहित आहे की मला वैयक्तिकरित्या यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल. पण मी त्यासाठी तयार आहे. आज भारत माझ्या देशातील शेतकऱ्यांसाठी, माझ्या देशातील मच्छीमारांसाठी, माझ्या देशातील पशुपालकांसाठी तयार आहे.
मोदी म्हणाले, काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत ज्यांचे योगदान कोणत्याही एका युगापुरते किंवा कोणत्याही एका क्षेत्रापुरते मर्यादित नाही. प्रो. एमएस स्वामीनाथन हे असेच एक महान शास्त्रज्ञ होते. त्यांनी विज्ञानाला सार्वजनिक सेवेचे माध्यम बनवले. स्वामीनाथन यांनी देशाच्या अन्न सुरक्षेला त्यांच्या जीवनाचे ध्येय बनवले. त्यांनी एक अशी जाणीव जागृत केली जी येणाऱ्या शतकानुशतके भारताच्या धोरणांना आणि प्राधान्यांना मार्गदर्शन करत राहील.
स्वामीनाथन यांच्याशी माझे अनेक वर्षांचे नाते आहे. गुजरातच्या जुन्या परिस्थितीशी अनेक लोक परिचित आहेत. पूर्वी दुष्काळ आणि चक्रीवादळांमुळे शेतीवर खूप संकट येत होते आणि कच्छमध्ये वाळवंटाचा विस्तार होत होता. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना, आम्ही मृदा आरोग्य कार्डवर काम सुरू केले. प्रो. स्वामीनाथन यांनी त्यात खूप रस दाखवला, त्यांनी आम्हाला मोकळेपणाने सूचना दिल्या आणि मार्गदर्शन केले. त्यांच्या योगदानामुळे, हा उपक्रम खूप यशस्वी झाला, असे मोदी यांनी सांगितले.
India will not bow down even if it has to pay the price, warns PM on Trump tariffs
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल!