विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबविल्यानंतर पाकिस्तानने सीमारेषेवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे. भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानकडून भारतातील 15 ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न आला. त्यामुळे भारताने ऑपरेशन सिंदूर 2.0 राबवत आता पाकिस्तानची रडार सिस्टीम (Pakistan Radar System) उद्ध्वस्त केली आहे.
भारताने पाकिस्तानवर आता ड्रोनचा वापर करत हल्ला केला आहे. ज्यामध्ये पाकिस्तानची रडार सिस्टीम उद्ध्वस्त झाल्याने पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे. भारतीय सैन्याकडून याबाबतची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे.
भारताने पाकिस्तानमधील तीन ठिकाणी HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली आहे. त्यांना नष्ट करण्यासाठी भारताने हेरोप ड्रोनचा वापर केला आहे.पाकिस्तानने चीनकडून HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली खरेदी केली आहे. त्याला FD-2000 असेही म्हणतात. ही एक लांब पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे, जी विमाने आणि क्रूझ क्षेपणास्त्रे पाडण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने पाकिस्तानवर आता पाकिस्तानमधील शहरांवर ड्रोन हल्ले केले आहेत. पाकिस्तानमधील 12 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून भारताच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला होतो. तो प्रयत्न भारताला हाणून पडला. यासंदर्भात भारत सरकारने अधिकृत पत्रक काढून ड्रोन हल्ला आणि पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचे म्हटले आहे.
भारताच्या एस ४०० हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानची क्षेपणास्त्र नष्ट केली. त्याचे अवशेष सीमा भागात दिसून येत आहे. भारताने पहिल्यांदाच एस ४०० या हवाई प्रणालीचा वापर भारताने केला आहे. रशियाने विकसित केलेली ही प्रणाली आहे. भारताने रशियाकडून ती घेतली आहे.
Indian Army Destroyed Pakistan Radar System
महत्वाच्या बातम्या
- Operation sindoor वर मोदींचे मॉनिटरिंग; जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले!!
- Operation sindoor : पाकिस्तानात 3 ठिकाणी 9 टार्गेटवर भारताचा क्षेपणास्त्र हल्ला; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला!!
- Devendra Fadnavis : अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Mahadev Jankar : भाजपने विचारले नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली, महादेव जानकारांची खंत