विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एक वादग्रस्त वक्तव्य करत दावा केला आहे की, “भारतीय ड्रोन आम्ही जाणूनबुजून रोखले नाहीत, कारण त्यामुळे आमच्या लष्करी ठिकाणांचा शोध लागू शकला असता.” khwaja asif
त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि त्यावर जोरदार टीका होत आहे. भारताने पाकच्या हद्दीत प्रवेश केलेल्या ड्रोनबाबत पाकिस्तानने कोणतीही कारवाई का केली नाही, याबाबत विचारले असता, आसिफ म्हणाले की, “आम्हाला आमची ठिकाणं उघड करायची नव्हती.”
एका थेट मुलाखतीत पाकने भारतीय फायटर जेट पाडल्याच्या दाव्यावर पुरावे मागितले असता, आसिफ यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टकडे बोट दाखवत, ‘भारतीय सोशल मीडियावर त्याचे पुरावे आहेत,’ असे उत्तर दिले.
पत्रकाराने तात्काळ हस्तक्षेप करत उत्तर दिलं, “सर, आपण पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आहात. सोशल मीडियावरची पोस्ट दाखवण्यापेक्षा अधिक जबाबदारीची अपेक्षा आपल्याकडून आहे.”
दरम्यान, ८ आणि ९ मेच्या रात्री पाकिस्तानी लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये ड्रोन आणि मुनिशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा सीमाभागांतून घुसखोरीचा प्रयत्न केला. भारतीय लष्कराने हे सर्व ड्रोन हल्ले अचूकतेने परतवून लावले असून, अनेक शस्त्रास्त्रांना हवेतच निष्क्रिय केल्याची माहिती लष्कराने दिली आहे.
भारतीय लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे की, “पश्चिम सीमेवर आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. मात्र, भारताच्या सार्वभौमत्वावर गदा आणण्याचा कुठलाही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. प्रत्येक अशा हालचालीस तडकाफडकी उत्तर दिलं जाईल.”
त्याआधी ८ मे रोजी भारतीय लष्कराने ५० हून अधिक पाकिस्तानी ड्रोन LoC व आंतरराष्ट्रीय सीमेजवळ निष्क्रिय केले होते.
Indian drones were not intercepted because our locations would have been exposed khwaja asif
महत्वाच्या बातम्या
- Operation sindoor वर मोदींचे मॉनिटरिंग; जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले!!
- Operation sindoor : पाकिस्तानात 3 ठिकाणी 9 टार्गेटवर भारताचा क्षेपणास्त्र हल्ला; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला!!
- Devendra Fadnavis : अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Mahadev Jankar : भाजपने विचारले नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली, महादेव जानकारांची खंत