विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केल्यावर आता भारताने पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केला आहे. हवाई हल्ल्यानंतर हतबल झालेल्या पाकिस्तानने भारतीय सीमेवर अंधाधुंद गोळीबार सुरु कला होता.
पाकिस्तानला धडा शिकण्यासाठी भारताने बगलिहार आणि सलाल धरणाचे दरवाजे गरुवारी उघडण्यात आले आहेत. यामुळे आता पाकिस्तानमधील वेगवेगळ्या भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.सीमावर्ती भागातील त्यांच्या लष्करी कारवायांवरही याचा परिणाम झाला आहे.
गेल्या काही दिवसांत भारताने पाकवर पाणी हल्ला करण्याची ही दुसरी वेळ आहे. रविवारी चिनाब नदीच्या पाण्याचा प्रवाह थांबवला होता, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यांचे विविध जलविद्युत प्रकल्प बंद करण्यात आले होते. मात्र, भारताने दुसऱ्या दिवशी पाणी सोडले. ऑपरेशन सिंदूरमुळे निराश झालेल्या पाकिस्तानने मंगळवारी रात्रीपासून भारताच्या सीमावर्ती भागात गोळीबार सुरू केला आहे. या गोळीबारात एक जवान शहीद झाला असून, १४ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.या हल्ल्यात जवळपास १०० नागरिक जखमी झाले आहेत. संबंधित सूत्रांनी सांगितले की, काल रात्री रियासीच्या दोडा-किश्तवारमध्ये मुसळधार पाऊस पडला. यामुळेच, बगलियार आणि सलाल धरणातील पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी बांधलेले दोन अतिरिक्त दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे रियासीच्या खाली अखनूरमध्ये पाण्याची पातळी २० फुटांपेक्षा जास्त वाढली आहे.
अखनूरच्या खाली असलेल्या पाकिस्तानी भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. चिनाब पाणलोट क्षेत्रात असलेल्या गढखल आणि परगवाल सेक्टरमधील काही पाकिस्तानी चौक्या पाण्याखाली गेल्या आहेत.सिंधू पाणी करारांतर्गत, चिनाब नदीचे पाणी रोखण्यापूर्वी किंवा त्यावर बांधलेल्या धरणांमधून अचानक पाणी सोडण्यापूर्वी पाकिस्तानला माहिती देण्यात येत होती. आता हा करार स्थगित करण्यात आला आहे, त्यामुळे आता त्याची माहिती पाकला दिली जाणार नाही. आता भारत जेव्हा हवे, तेव्हा पाकिस्तानमध्ये दुष्काळ आणि पूर परिस्थिती निर्माण करू शकतो.
India water strike on Pakistan, flood in many areas due to opening of gates of Baglihar and Salal dams
महत्वाच्या बातम्या
- Operation sindoor वर मोदींचे मॉनिटरिंग; जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले!!
- Operation sindoor : पाकिस्तानात 3 ठिकाणी 9 टार्गेटवर भारताचा क्षेपणास्त्र हल्ला; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला!!
- Devendra Fadnavis : अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Mahadev Jankar : भाजपने विचारले नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली, महादेव जानकारांची खंत