विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : International Monetary Fund पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना पोसले जात असल्याचे भारताने पुरावे देऊनही पाकिस्तानला युद्धाच्या तोंडावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने २.३ अब्ज डॉलर्स एवढ्या मोठ्या किंमतीची दोन पॅकेज मंजूर केली आहेत. भारताने हा निधी पाकिस्तानला देण्यास विरोध केला होता. मतदानास अनुपस्थित राहिला होता.International Monetary Fund
पाकिस्तान हा पैसा दहशतवाद्यांवर खर्च करणार असा इशारा भारताने दिला होता. धक्कादायक म्हणजे आयएमएफकडून पाकिस्तानला तातडीने १ अब्ज डॉलर्स म्हणजेच ८,५०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. भारताविरोधात शस्त्रास्त्रे मिळविण्यासाठी पाकिस्तान या पैशांचा वापर करणार आहे. आयएमएफने गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानसाठी प्रमाणाच्या बाहेर पैसा दिला आहे. १ अब्ज डॉलर्स (८,५०० कोटी रुपये) एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी (EFA) अंतर्गत तात्काळ दिले जातील, तर १.३ अब्ज डॉलर्स (११,००० कोटी रुपये) कर्ज पुढील २८ महिन्यांत हप्त्यांमध्ये दिले जाणार आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले, पाकिस्तानसाठी आयएमएफने १ अब्ज डॉलर्सचा हप्ता मंजूर करणे हे भारताच्या दबाव धोरणाचे अपयश आहे, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या कार्यालयाकडून वक्तव्य प्रसारित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने पाकिस्तानला प्रस्तावित केलेल्या १.३ अब्ज डॉलर्सच्या बेलआउट पॅकेजवर मतदान करण्यापासून भारत दूर राहिला होता. भारताने पाकिस्तानकडून आयएमएफच्या मदत अटींची पूर्तता करण्यात वारंवार अपयश आल्याबद्दल चिंता व्यक्त केली. परंतू, तरीही आयएमएफने पाकिस्तानला पैसा दिला आहे. पाकिस्तानला मिळणारी आर्थिक मदत अप्रत्यक्षपणे त्याच्या गुप्तचर संस्थांना आणि लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांना मदत करते, हे लोक भारतावर हल्ले करत असतात, असेही भारताने म्हटले होते.
International Monetary Fund gives Pakistan, which is supporting terrorists, approves two packages worth $2.3 billion
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित