विशेष प्रतिनिधी
तिरुवनंतपुरम : Subhash Chandra Bose भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील साेनेरी पान असलेल्या आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बाेस यांचा केरळच्या पाठ्यपुस्तकात अवमान करण्यात आला आहे. केरळमध्ये वर्ग चौथीसाठी तयार करण्यात आलेल्या शिक्षक मार्गदर्शिकेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटीश भीतीने जर्मनीत पलायन केले, असा उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला आहे. या संदर्भात केरळ सरकारने तत्काळ कारवाई करत चुका दुरुस्त केल्या असून संबंधित पाठ्यपुस्तक समितीच्या सदस्यांना पुढील शैक्षणिक कामातून वगळले आहे.Subhash Chandra Bose
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) तयार केलेल्या मसुदा पुस्तकात वादग्रस्त मजकूर समाविष्ट झाला होता. शिक्षण खात्याने नंतर हा मजकूर दुरुस्त केला. शिक्षणमंत्री व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व्ही. शिवनकुट्टी यांनी सांगितले, “मसुदा पाठ्यपुस्तकात काही ऐतिहासिक चुका झाल्या होत्या. हे प्रकरण लक्षात येताच तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले. विद्यार्थ्यांपर्यंत केवळ सत्य ऐतिहासिक माहितीच पोहोचली पाहिजे. केरळ सरकारला केंद्र सरकारसारखी इतिहास विकृत करण्याची भूमिका मान्य नाही. संबंधित समिती सदस्यांना पुढील शैक्षणिक उपक्रमांतून वगळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”Subhash Chandra Bose
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आरोप केला की या पुस्तकात आणखी चुका आहेत. अभाविपचे राष्ट्रीय सचिव श्रवण बी. राज यांनी प्रसिद्ध निवेदनात म्हटले, “इतिहासाचे विकृतीकरण ही कम्युनिस्ट सरकारची जाणीवपूर्वक केलेली कारवाई आहे. विद्यार्थ्यांना चुकीचा इतिहास शिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय पुस्तकाच्या दुसऱ्या धड्यातील नकाशातून आसाम आणि झारखंड राज्यांची नावे मुद्दाम वगळण्यात आली आहेत. हे राष्ट्राच्या एकात्मतेसाठी धोका निर्माण करणारे असून, चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या आसामवरील घुसखोरीच्या डावाला पाठिंबा देणारे पाऊल आहे.
It is said that Netaji was scared and fled to Germany… Subhash Chandra Bose is insulted in Kerala textbook.
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला