विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नक्कल करण्यासाठी अक्कलही लागते आणि या नालायकांकडे ती देखील नाही. पाकिस्तानकडून जे काही सांगितले जाईल, त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. आमचे भारतीय परराष्ट्र मंत्रालय तसेच आमचा अधिकृत प्रवक्ता जे सांगेल त्यावर विश्वास ठेवा, असे आवाहन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी केले.
कुवेतमधील अनिवासी भारतीयांशी संवाद साधताना खासदार ओवैसी यांनी पाकिस्तानच्या या खोटेपणाचा पर्दाफाश केला. तथाकथित पाकिस्तानी फील्ड मार्शल मुनीर यांनी पंतप्रधान शरीफ यांना एक फोटो भेट दिला. प्रत्यक्षात 2019मध्ये चिनी सैन्याच्या सरावाचा तो फोटो आहे. पाकिस्तानच्या भारतावरील कथित विजयाचे प्रतिक म्हणून तो दिला होता. हे मूर्ख विदूषक भारताशी स्पर्धा करू पाहात आहेत, असे ते म्हणाले.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान जगासमोर पूर्णपणे उघडा पडला आहे. त्यामुळे पतंप्रधान शाहबाज शरीफ आणि त्यांचे सरकार डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असले तरी, तोही एक चेष्टेचाच विषय बनला आहे. हे मूर्ख विदूषक भारताशी स्पर्धा करायला निघाली आहे, असेही ओवैसी यांनी सुनावले.
पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल असीम मुनीर यांना फील्ड मार्शल बनवण्यात आल्यावर त्यांनी एका डिनरचे आयोजन केले होते. ज्यामध्ये पाकिस्तानचे शाहबाज शरीफ यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते. जनरल असीम मुनीर यांनी मोठेपणा दाखवण्यासाठी शाहबाज शरीफ यांना एक फोटो फ्रेम भेट दिली. हा फोटो भारताविरुद्ध पाकिस्तानने केलेल्या लष्करी कारवाईचा असल्याचा दावाही केला होता. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यावर मुनीर यांचा हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे समोर आले. Asaduddin Owaisi
It takes common sense to imitate, Asaduddin Owaisi mocks Pakistan
महत्वाच्या बातम्या
- Economy : अर्थव्यवस्थेत भारताने जपानला टाकलं मागे, आता जर्मनीची वेळ
- Jyoti Malhotras : ज्योती मल्होत्राच्या फोनवरून मोठा खुलासा, पाकिस्तानी युट्यूबरसोबत करत होती काम!
- Lalu Prasad Yadav : बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी मोठी कारवाई
- Mysore Pak : आता ‘म्हैसूरपाक’ नाही ‘म्हैसूर श्री’ म्हणायचं