विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : माझे ऐकत राहा.. यामुळे तुमचेच ज्ञान वाढेल. तुमच्या डोक्यात जो भूसा भरला आहे, तोही साफ होईल, अशा शब्दांत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पाकिस्तानला सुनावले आहे.
काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर ऑल इंडिया ओवैसी सातत्याने पाकिस्तानवर कडाडून टीका करत आहेत. त्यांनी भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरला उघडपणे पाठिंबा दिला. त्यामुळेच पाकिस्तानी समर्थक त्यांना लक्ष्य करत आहेत. टीकाकारांना सुनावताना ते म्हणाले, मी पाकिस्तानी दुल्ह्याचा भाऊ झालो आहे. माझ्यासारखा स्पष्टवक्ता आणि हँडसम तिथे कोणीही राहिलेला नाही. तुम्ही माझ्याकडे बघत राहा, माझे ऐकत राहा.. यामुळे तुमचेच ज्ञान वाढेल. तुमच्या डोक्यात जो भूसा भरला आहे, तोही साफ होईल.
परदेशात जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाबाबत ते म्हणाले, ही एक चांगली गोष्ट आहे. आपल्या देशातील दहशतवादी कारवायांबद्दल सर्व देशांना माहिती द्यावीच लागेल. भारताची भूमिका नेहमीच दहशतवादाविरुद्ध राहिली आहे. विशेषतः, शेजारील देश वारंवार आपल्या देशातील दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी खतपाणी देत आहे. म्हणून, जगासमोर त्यांचा पर्दाफाश करण्याची आवश्यकता आहे.
तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातही एक शिष्टमंडळ परदेशात गेले होते. यानंतर, 2008मध्ये झालेल्या 26/11च्या हल्ल्यानंतर, डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारनेही एक शिष्टमंडळ पाठवले होते, याचा उल्लेख करून ओवैसी म्हणाले, पाकिस्तानचा डोलाराच असत्यावर उभा आहे. ते खोटे बोलतील… आमच्याकडे अणुबॉम्ब आहे, असे सांगत आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतील. इराण आणि इस्रायलकडेही अणुबॉम्ब आहेत, मग ते थांबले आहेत का? तेही एकमेकांना मारत आहेत.
आम्ही आमच्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहोत. आमचे पक्ष भिन्न आहेत, पण आम्ही देशासाठी काम करत आहोत. पाकिस्तान भारताला कशाप्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे, हे खासदार इतर देशांमध्ये जाऊन सांगतील. पूंछमध्ये चार निष्पाप लहान मुलांचा मृत्यू झाला. त्यात दोन जुळी मुले होती. पाच लष्करी जवान शहीद झाले. 21 नागरिकांचा मृत्यू झाला. घरांचे नुकसान झाले. या सर्व गोष्टी जगासमोर ठेवायच्या आहेत. हे घडते ते योग्य आहे, का असा प्रश्न जगाला विचारू, असे त्यांनी सांगितले.
भारत हा एक साधा देश नाही. आपली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि येथे कोणीही डिस्टर्ब झाले तर त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम होईल, हे संपूर्ण जगाने जाणून घेतले पाहिजे, असेही ओवैसी म्हणाले.
Keep listening to me.. the chaff in your head will be cleared, Asaduddin Owaisi told Pakistan
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर