विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: वादग्रस्त विधानामुळे ते सतत वादात अडकणारे रमेश बिधुरी हेच भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, असे सांगून आम आदमी पक्षाचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खेळी खेळली आहे. मात्र भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण असेल? हे ठरविण्याचा केजरीवाल यांना अधिकार नाही, असा संताप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे.
दिल्ली विधानसभेच्या प्रचारात आम आदमी पक्ष आणि भाजपात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे. भाजपाचे माजी खासदार रमेश बिधुरी यांना लोकसभेचे तिकीट नाकारल्यानंतर ते आता विधानसभेसाठी मैदानात उतरले आहेत. मात्र त्यांच्या भाजपा येत्या दोन-तीन दिवसांत याची अधिकृत घोषणा करेल, असेही ते म्हणाले. मात्र केजरीवालांच्या या खेळीवर आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आता आम आदमी पक्षाचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रमेश बिधुरी हेच भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, असे म्हटले आहे.
अरविंद केजरीवाल यांनी रमेश बिधुरी यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी ठरवले जाईल, असे सांगतानाच त्यांना जाहीर चर्चेचे आव्हान दिले आहे. “रमेश बिधुरींनी सार्वजनिक मंचावर माझ्याशी चर्चा करण्यासाठी यावे. दिल्लीच्या विकासासाठी त्यांच्याकडे काय नियोजन आहे, हे सांगावे. भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आणि इतर पक्षाच्या नेत्यांमध्ये अशी खुली चर्चा व्हायला हवी. रमेश बिधुरी यांनी खासदार असताना मागच्या १० वर्षांत दिल्लीसाठी काय केले, हे ही सांगावे. तसेच विरोधकांनीही दिल्लीकरांसाठी काय करणार, याबद्दलची माहिती दिली पाहीजे.”
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केजरीवालांच्या दाव्यावर जोरदार टीका केली आहे. “भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण असेल? हे ठरविण्याचा केजरीवाल यांना अधिकार नाही. आमचा मुख्यमंत्री कोण असेल? हे केजरीवाल कसे काय ठरवू शकतात. ही त्यांची केवळ रणनीती आहे. पण दिल्लीकर त्यांचे आता काहीच चालू देणार नाहीत”, अशी टीका अमित शाह यांनी आज “झुग्गी बस्ती प्रधान संमेलन” या कार्यक्रमात बोलताना दिली.
Kejriwal’s knock and Amit Shah’s anger
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे गटाचे स्वबळावरच निवडणुका लढविण्याचे संकेत, महाविकास आघाडीत फूट स्पष्ट
- Sanjay Raut स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, संजय राऊत यांची आरोळी
- वाल्मिक कराड वगळता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का
- Sanjay Raut काही लोक मुख्यमंत्रीपदाचा कोट शिवून बसले होते, संजय राऊत यांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल




















