विशेष प्रतिनिधी
पाटणा : केंद्रीय गृह मंत्रालयानं लालू प्रसाद यादव यांचा मुलगा आणि जनशक्ती जनता दलाचे प्रमुख तेज प्रताप यादव यांची सुरक्षा वाढवली आहे. तेजप्रताप यादव आपले वडील लालुप्रसाद आणि भाऊ तेजस्वी यांच्या विरोधात लढत आहेत. Lalu Prasad Yadav
व्हीआयपी प्रोटोकॉलनुसार ही सुरक्षा देण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तेज प्रताप यादव यांच्या सुरक्षेसंदर्भात सुरक्षा यंत्रणांकडून एक रिपोर्ट देण्यात आला होता. त्यानंतर केंद्रानं त्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय़ घेतला आहे. तेज प्रताप यादव यांना वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्यानं आता त्यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे जवान तैनात असतील.
तेज प्रताप यादव यांच्या सुरक्षेसंदर्भात सुरक्षा यंत्रणांकडून केंद्रीय गृह मंत्रालयाला माहिती देण्यात आली होती. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तेज प्रताप यादव यांनी त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. तेज प्रताप यादव यांनी देखील सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती.
तेज प्रताप यादव यांच्या मागणीनुसार केंद्रीय गृहमंत्रालयाकडून त्यांना वाय कॅटेगरीची सुरक्षा देण्यात आली आहे. आता तेज प्रताप यादव यांना सीआरपीएफच्या जवानांचं संरक्षण असेल. तेज प्रताप यादव यांना केंद्रानं सुरक्षा दिल्यानं चर्चा सुरु झाल्या आहेत.
वाय प्लस कॅटेगरीमध्ये एकूण 11 सुरक्षा रक्षक असतात. आर्म्ड फोर्सचे कमांडो तैनात असतात. त्यापैकी 5 जवान घराच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. याशिवाय ही सुरक्षा तीन शिफ्टमध्ये दिली जाते. के अलावा तीन शिफ्टों में सुरक्षा दी जाती है.
लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यादव यांना राजद मधून काढून टाकलं आहे. त्यामुळं तेज प्रताप यादव यांनी जनशक्ती जनता दलाची स्थापना केली आहे. त्यांच्या पक्षाचे 40 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते स्वत: महुआ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ते जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबरला झालं असून पुढील टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबरला होणार आहे. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी मतदान झालं आहे. आता दुसऱ्या टप्प्यात 11 नोव्हेंबरला 122 जागांवर मतदान होईल. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 64.66 टक्के मतदान झालं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 14 नोव्हेंबरला होणार आहे.
Lalu Prasad Yadav son gets BJP protection, father is fighting independently against brother
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…



















