विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी बीजेडीचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार पिनाकी मिश्रा यांच्याशी लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. हे लग्न ३ मे रोजी जर्मनीत अत्यंत खासगी स्वरूपात पार पडल्याचे सांगितले जात आहे. सध्या या विवाहाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, दोघेही हातात हात घालून आनंदाने चालताना दिसत आहेत.
६५ वर्षीय पिनाकी मिश्रा हे ओडिशामधील पुरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. त्यांनी अनेकवेळा लोकसभा निवडणुका जिंकल्या असून, बीजेडीतील ते एक प्रतिष्ठित आणि जाणते नेते मानले जातात. दुसरीकडे, महुआ मोईत्रा या तृणमूल काँग्रेसच्या लोकप्रिय खासदार असून त्या सध्या कर्जमाफी, धार्मिक असहिष्णुता, महिला सक्षमीकरण आणि संसदीय सभागृहातील आक्रमक भाषणांमुळे चर्चेत असतात.
- Devendra Fadnavis : आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संयमी जीवनशैली आवश्यक, देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
हा विवाह अत्यंत खासगी ठेवण्यात आला होता. दोघांनीही या विवाहाची अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. मात्र, ३ मे रोजी जर्मनीमध्ये पार पडलेल्या या विवाह समारंभात अगदी मोजक्या नातेवाईक आणि जवळच्या मित्रमंडळींची उपस्थिती होती, अशी माहिती काही माध्यमांनी दिली आहे.
महुआ मोईत्रा यांच्यावर अलीकडेच लोकसभा विशेष समितीने ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणात दोषारोप ठेवला होता आणि त्यामुळे त्यांचं सदस्यत्वही काही काळासाठी रद्द झालं होतं. त्यानंतर त्यांनी मतदारसंघात पुन्हा जोरदार प्रचार सुरू केला आणि आपल्या ठाम भूमिका मांडल्या.
या लग्नामुळे दोघांच्या राजकीय कारकिर्दीत कोणते नवे वळण येईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगाल या दोन वेगळ्या राजकीय पार्श्वभूमींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या दोन नेत्यांच्या नात्याने राष्ट्रीय राजकारणात नवीन चर्चा सुरू केल्या आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या त्यांच्या फोटोमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
Mahua Moitra and Pinaki Mishra secretly married in Germany
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शे