Manoj Jarange मनोज जरांगे यांच्यावर उपचार, सलाईन लावून उपोषण सुरू

Manoj Jarange मनोज जरांगे यांच्यावर उपचार, सलाईन लावून उपोषण सुरू

विशेष प्रतिनिधी

अंतरवाली सराटी : अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांवर अखेर उपचार सुरु करण्यात आले आहेत. जरांगे यांना सलाईन लावण्यात आले आहे.
मंगळवारी रात्री आमदार सुरेश धस यांनी जरांगे यांची भेट घेऊन सलाईन लावा, उपचार घ्या अशी विनंती केली होती. उपचार घेतल्यास आपल्याला चर्चा करता येईल असे धस जरांगे यांना म्हणाले होते. त्यांनतर आज जरांगे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. उपस्थित मराठा आंदोलकांनी जरांगे यांना उपचार घेण्यास भाग पाडले. त्यामुळे जरांगे यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. आज जरांगे काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा उपोषण सुरु करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा हा आठवा टप्पा असून त्यांनी याआधी सात टप्प्यात उपोषण केले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.

याच पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. रात्री उशिरा आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानी मनोज जरांगे पाटील यांना उपचार घेण्याची विनंती केली.

गेल्या दीड वर्षांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन व उपोषण करत आहेत. मराठा समाजाच्या समस्या पुढे मांडत न्याय मिळावा यासाठी त्यांनी अनेकवेळा उपोषण केलं आहे. मात्र आत्तापर्यंत दिलेली आश्वासनं पूर्ण न झाल्याने मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट 2023 ला पहिले उपोषण सुरू केलं. 14सप्टेंबर 2023 पर्यंत एकूण 17 दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांचं उपोषण सुरू होतं.

Manoj Jarange is on a fast, treated with saline

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023