माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन मंत्रिमंडळात; निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा मुस्लीम मतदारांना चुचकरण्याचा प्रयत्न

माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन मंत्रिमंडळात; निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा मुस्लीम मतदारांना चुचकरण्याचा प्रयत्न

विशेष प्रतिनिधी

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात माजी भारतीय क्रिकेट कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचा समावेश होणार असल्याची अधिकृत घोषणा होताच राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. अझरुद्दीन यांचा शपथविधी शुक्रवारी दुपारी १२.१५ वाजता होणार आहे.

मात्र, या निर्णयावर भाजप आणि भारत राष्ट्र समिती (BRS) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, जुबिली हिल्स विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. भाजपने या नियुक्तीविरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, “हा निर्णय आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असून एका विशिष्ट समाजाच्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे,” असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे.

जुबिली हिल्स मतदारसंघात सुमारे एक लाखांहून अधिक मुस्लीम मतदार आहेत, त्यामुळे अझरुद्दीन यांचा मंत्रिमंडळात प्रवेश हा काँग्रेसकडून मतदारांना आकर्षित करण्याचा राजकीय डाव असल्याची चर्चा सुरू आहे. हा मतदारसंघ २०१४ मध्ये तेलंगणाच्या स्थापनेपासून बीआरएसच्या ताब्यात आहे.



काँग्रेसने मात्र या आरोपांचे खंडन केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्का म्हणाले, “अझरुद्दीन यांची नियुक्ती ही त्यांच्या खेळाडू आणि राजकीय कारकिर्दीतील योगदानाचा सन्मान आहे. भाजप आणि बीआरएस यांच्यातील आडवा-आडवीचा राजकीय करार असल्यामुळेच हे पक्ष या निर्णयाला विरोध करत आहेत.”

अझरुद्दीन यांना ऑगस्ट २०२५ मध्ये राज्य विधानपरिषदेवर राज्यपाल कोट्यातून नामनिर्देशित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी अझरुद्दीन आणि ज्येष्ठ तेलंगणा नेते एम. कोदंडराम यांना विधान परिषदेत पाठवले होते.

तेलंगणामधील मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यासह एकूण १८ मंत्रीपदे असून सध्या १३ मंत्री कार्यरत आहेत. अझरुद्दीन यांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, अझरुद्दीन यांचा समावेश हा केवळ क्रिकेटप्रेमी किंवा मुस्लीम मतदारांनाच नाही, तर शहरी मतदारवर्गालाही आकर्षित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. जुबिली हिल्स मतदारसंघातील काँग्रेस, भाजप आणि बीआरएस यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता या घडामोडीनंतर निर्माण झाली आहे.

अझरुद्दीन पूर्वी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते, त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर हैदराबाद आणि मोरादाबाद येथून लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. त्यांच्या मंत्रिपद प्रवेशामुळे तेलंगणातील काँग्रेसला शहरी आणि अल्पसंख्याक मतदारांचा विश्वास परत मिळवण्याचा फायदा होऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे.

Mohammad Azharuddin in the cabinet Telangana

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023