विशेष प्रतिनिधी
मुंबई : “आजादी का अमृत महोत्सव”च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन, मुंबई मेट्रो लाईन-३ चा अंतिम टप्पा राष्ट्राला समर्पित करणे आणि “मुंबई वन” या भारतातील पहिल्या इंटिग्रेटेड कॉमन मोबिलिटी अॅपचा शुभारंभ करणार आहेत. ९ ऑक्टोबर रोजी मुंबईत यूकेचे पंतप्रधान सर कीअर स्टार्मर यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चाही होणार आहे. Narendra Modi
पंतप्रधान मोदी ८ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे ३ वाजता नवी मुंबई येथे पोहोचतील. तिथे ते नव्याने उभारण्यात आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (NMIA) उद्घाटन करतील. या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचा खर्च सुमारे ₹१९,६५० कोटी असून हे भारतातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्प आहे.
हे विमानतळ मुंबई प्रदेशासाठी दुसरे आंतरराष्ट्रीय केंद्र ठरेल. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा प्रवासी ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. दरवर्षी ९ कोटी प्रवासी आणि ३.२५ दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक येथून होणार आहे.
विमानतळावर ऑटोमेटेड पीपल मूव्हर (APM) प्रणाली, वॉटर टॅक्सी कनेक्शन, सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल (SAF) साठवण, ४७ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती, आणि ईव्ही बस सेवा यांसारख्या अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक सुविधा उपलब्ध असतील.
पंतप्रधान मोदी मुंबई मेट्रो लाईन-३ (अक्वा लाईन) च्या अंतिम टप्पा (फेज 2B) चे उद्घाटन करणार आहेत. हा टप्पा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड दरम्यान असून त्यासाठी ₹१२,२०० कोटींचा खर्च झाला आहे.संपूर्ण ३३.५ किमी लांबीची लाईन-३, एकूण ₹३७,२७० कोटी खर्चाने बांधली गेलेली, राष्ट्राला समर्पित केली जाईल.
ही मुंबईतील पहिली पूर्णपणे भूमिगत मेट्रो लाईन असून, ती दररोज १३ लाख प्रवाशांना सेवा देईल. या लाईनमुळे दक्षिण मुंबईतील फोर्ट, काला घोडा, मरीन ड्राइव्ह, मंत्रालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आणि बॉम्बे शेअर बाजार अशा महत्त्वाच्या ठिकाणांना थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळेल.
या दौऱ्यात पंतप्रधान “मुंबई वन” या एकात्मिक मोबिलिटी अॅपचे उद्घाटन करतील.
या अॅपद्वारे ११ सार्वजनिक वाहतूक यंत्रणा (जसे की मुंबई मेट्रो, मोनोरेल, उपनगरी रेल्वे, BEST, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई परिवहन इ.) एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर जोडल्या जातील.
अॅपमध्ये एकत्रित डिजिटल तिकीट व्यवस्था, रिअल-टाइम अपडेट्स, पर्यायी मार्ग सूचना, SOS सुरक्षा सुविधा, आणि नकाशावर आधारित माहिती उपलब्ध असेल, ज्यामुळे प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित बनेल.
महाराष्ट्रातील कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या माध्यमातून शॉर्ट-टर्म एम्प्लॉयेबिलिटी प्रोग्राम (STEP) ची सुरुवात पंतप्रधान करतील. ही योजना ४०० सरकारी आयटीआय आणि १५० तांत्रिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये राबवली जाईल.
या अंतर्गत २५०० प्रशिक्षण बॅचेस, त्यात ३६४ महिलांसाठी विशेष बॅचेस, तसेच AI, IoT, EV, सोलर, अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या नव्या तंत्रज्ञानावर अभ्यासक्रम सुरु केले जातील.
Narendra Modi’s Maharashtra visit on October 8th and 9th
महत्वाच्या बातम्या
- Ravindra Dhangekar चंद्रकांतदादा गुन्हेगारांना पाठीशी का घालतात, रवींद्र धंगेकरांचा थेट सवाल
- Uddhav Thackeray : मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? आत्मचिंतन करा : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
- Congress : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करणार
- Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, तासभर चर्चा झाल्याने राजकीय खळबळ