विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे, महाराजे नसून ते आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत, शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी नमन केले. पंतप्रधान मोदींनी आपल्या सोशल मीडिया हँडल वरून एक व्हिडिओ क्लिप सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांचे वैशिष्ट्य वर्णन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे साहासी जीवन, शौर्य धैर्य आणि शांतीपूर्ण राजनीती जगभरातल्या करोडो लोकांसाठी प्रेरणादायी राहिली. शिवाजी महाराजांची न्यायप्रियता, स्वराज्य निर्मिती आपणा सर्वांना जनसामान्यांच्या कल्याणासाठी अविरत कार्य करण्याची प्रेरणा देत राहील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी विचारांमधून विकास भारताच्या संकल्पपूर्तीसाठी आम्ही अविरत कार्यरत राहू, अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो.
त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी… pic.twitter.com/zu0vLviiPf
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2025
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या साहसी कार्याचे स्मरण केले.
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी देखील एक फोटो शेअर करून छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साहसी आणि निडर जीवनामुळे जनसामान्यांसाठी आवाज उठवण्याची आम्हाला प्रेरणा मिळाली, असे राहुल गांधी सोशल मीडिया हँडल वर लिहिले.
छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं।
अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण के साथ आवाज़ उठाने की प्रेरणा दी।
उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणास्रोत रहेगा। pic.twitter.com/1jOCYOkrC1
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 19, 2025