विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आपल्या शूर सैनिकांनी शत्रूंना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा दिली आहे. आता आम्ही अण्वस्त्रांच्या धमक्यांना भीक घालणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावर झेंडावंदन केले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सलग 12 व्या वेळी तिरंगा फडकवला.
पंतप्रधान म्हणाले की, आज देशभरातून मातृभूमीचा जयघोष ऐकू येतो आहे. महात्मा गांधींच्या सिद्धांतावर चालत असताना संविधान सभेच्या सदस्यांनी एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. भारताचे संविधान 75 वर्षांपासून दीपस्तंभाप्रमाणे आपल्याला मार्ग दाखवतो आहे. अनेक महापुरुषांनी जसे की डॉ. राजेंद्र प्रसाद, बाबासाहेब आंबेडकर, पंडीत नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, सर्वपल्ली राधाकृष्णन या सगळ्यांनीच संविधान निर्मितीसाठी योगदान दिले. नारी शक्तीमधल्या विदुषींनीही भारताचे संविधान सशक्त केले. आज लाल किल्ल्यावरुन देशाला दिशा देणाऱ्या संविधानाची निर्मिती करणाऱ्यांना आदराने नमन करतो.
हा उत्सव देशाच्या एकतेची भावना सतत बळकट करत आहे. तिरंगा भारताच्या प्रत्येक घरात आहे, मग तो वाळवंटापासून हिमालयापर्यंत असो, समुद्रकिनारा असो किंवा दाट लोकवस्तीचा भाग असो. आज आपल्याला लाल किल्ल्यावरून ऑपरेशन सिंदूरच्या शूर सैनिकांना सलाम करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या शूर सैनिकांनी शत्रूंना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा दिली आहे. पण आता आम्ही अण्वस्त्रांच्या धमक्यांना भीक घालणार नाही, असा सांगत मोदींनी शत्रू देशांना इशारा देखील दिला.
आता रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. आता देशाला कळले आहे की सिंधू करार किती अन्यायकार आणि एकतर्फी होता. भारतातून निघणाऱ्या नद्यांचे पाणी शत्रूच्या शेतांना सिंचन करत आहे आणि माझ्या देशाची जमीन पाण्याशिवाय तहानलेली आहे. हा कसला करार होता? गेल्या सात दशकांपासून देशातील शेतकऱ्यांचे अकल्पनीय नुकसान झाले आहे. भारत आणि त्याच्या शेतकऱ्यांचा भारताच्या हक्काच्या पाण्यावर एकमात्र अधिकार आहे. भारत भविष्यात सिंधू करार सहन करणार नाही कारण तो दशकांपासून ते सहन करत आहे. शेतकरी आणि राष्ट्राच्या हितासाठी आम्ही हा करार स्वीकारत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
Narendra Modi warns that he will not be cowed by threats of nuclear weapons
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला