विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनीलाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हाय पॉवर डेमोग्राफी मिशन’ स्थापनेची घोषणा केली. सीमावर्ती भागांमध्ये होत असलेल्या लोकसंख्यात्मक बदलांबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत मोदींनी हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे सांगितले. Narendra Modi
मोदी म्हणाले, देशाच्या लोकसंख्येच्या रचनेत बदल घडवण्यासाठी ठरवून कट रचला जात आहे. घुसखोर तरुणांचे रोजगार हिसकावून घेत आहेत, बहिणींवर-मुलींवर डोळा ठेवत आहेत, आदिवासींना फसवून त्यांची जमीन बळकावत आहेत. सीमावर्ती भागांतील लोकसंख्यात्मक बदल राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे. कोणतेही राष्ट्र हे घुसखोरांच्या हाती सोपवू शकत नाही. त्यामुळे आम्ही ‘हाय पॉवर डेमोग्राफी मिशन’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.”
ही घोषणा केंद्र सरकारकडून सुरु असलेल्या ‘ऑपरेशन पुशबॅक’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आली आहे. या मोहिमेअंतर्गत बांगलादेश व म्यानमारमधून आलेल्या बेकायदेशीर मुस्लिम व रोहिंग्या घुसखोरांना शोधून, अटक करून, परत पाठवले जात आहे.
आसाममध्ये बांगलादेश सीमेवरील हद्दीतून अनेक वर्षांपासून बांगलादेशी मुस्लिमांची घुसखोरी झाली आहे. बनावट कागदपत्रे (आधार, रेशनकार्ड) मिळवून हे लोक मजुरी, गुन्हेगारी, जमीन बळकावणे अशा कृत्यांत गुंततात. २०११ च्या जनगणनेनुसार मुस्लिमांची टक्केवारी ३०.९% वरून ३४% झाली. धुबरी, बरपेटा, गोलपारा ही जिल्हे मुस्लिम बहुसंख्य झाली आहेत.
पश्चिम बंगालमध्येही उत्तर २४ परगणा, मुर्शिदाबाद, मालदा या जिल्ह्यांत मुस्लिम लोकसंख्या वेगाने वाढली आहे. त्रिपुरा, झारखंड, जम्मू-काश्मीर यांनाही या घुसखोरीचा फटका बसला आहे.
इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली मध्ये प्रकाशित प्रा. शामिका रवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधनानुसार २००१ ते २०११ दरम्यान हिंदू लोकसंख्या ८०.४६% वरून ७९.८% झाली (०.७% घट). मुस्लिम लोकसंख्या १३.४३% वरून १४.२३% झाली (०.८% वाढ). ६४० जिल्ह्यांपैकी ४६८ जिल्ह्यांत हिंदू लोकसंख्या घटली. ५१३ जिल्ह्यांत मुस्लिम लोकसंख्या वाढली. मुस्लिम लोकसंख्येची वाढ २४.६% तर हिंदूंची वाढ १६.८%.
आसाम व बंगालातील सीमावर्ती जिल्ह्यांत मुस्लिम लोकसंख्येचा वाढीचा दर हिंदूंपेक्षा जास्त आहे. यामुळे स्थानिकांच्या रोजगार, संस्कृती व धार्मिक ओळखीवर धोका निर्माण झाला आहे.
Narendra Modi’s announcement of ‘High Power Demography Mission’, situation in border states is dire
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला