अखिलेशुद्दिनकडून वेगळं काय अपेक्षित अयोध्येतील दीपोत्सवावर टीका करत ख्रिसमसचे कौतुक करणाऱ्या अखिलेश यादववर नेटकऱ्यांची झोड

अखिलेशुद्दिनकडून वेगळं काय अपेक्षित अयोध्येतील दीपोत्सवावर टीका करत ख्रिसमसचे कौतुक करणाऱ्या अखिलेश यादववर नेटकऱ्यांची झोड

विशेष प्रतिनिधी

लखनौ : देशभरात दिवाळीच्या तयारीचा उत्साह असताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अयोध्येतील दीपोत्सवावर केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद पेटला आहे. यादव यांनी “दिवाळीत दिवे लावणे म्हणजे पैशांचा अपव्यय” असे म्हटले असून ख्रिसमसच्या सजावटीचे कौतुक केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून नेटकऱ्यांनी त्यांना ‘अखिलेशुद्दिन यादव’ असे संबोधून खिल्ली उडवली आहे. Akhilesh Yadav

धनतेरसच्या दिवशी लखनौ येथे पत्रकार परिषदेत बोलताना यादव म्हणाले, “मी भगवान रामाच्या नावाने एक सूचना देतो. परदेशातील शहरांमध्ये ख्रिसमसच्या वेळी अनेक आठवडे उजळलेली सजावट असते. आपल्यालाही तसं शिकायला हवं. पुन्हा पुन्हा तेलाचे दिवे आणि मेणबत्त्या लावून पैसे का वाया घालवायचे? सरकारने या दिखाव्याला आळा घालायला हवा. आम्ही सत्तेत आलो तर दिव्यांपेक्षा अधिक सुंदर इलेक्ट्रिक लाईट्सने सजावट करू.”



त्यांच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी ट्विटर आणि फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर संताप व्यक्त केला. अनेकांनी लिहिले, “ज्यांना राम आणि अयोध्येचा इतिहास समजत नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची?”, तर काहींनी टोमणा मारला, “अखिलेशुद्दिन यादव यांनी पुन्हा हिंदू सणांविषयीचा तिरस्कार दाखवला.” अनेकांनी यादव यांच्यावर ‘हिंदू विरोधी मानसिकता’ असल्याचा आरोप केला.

भाजप नेत्यांनीही या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले, “दीपोत्सव हा श्रद्धा आणि संस्कृतीचा उत्सव आहे. यावर टीका करणे म्हणजे राम भक्तांचा अपमान आहे. अशा विधानांमुळे समाजवादी पक्ष आपला खरा चेहरा दाखवतो.”

दरम्यान, समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्यांनी बचावात्मक भूमिका घेत, “अखिलेश यादव यांनी केवळ पर्यावरणपूरक साजरीकरणाचा मुद्दा मांडला होता, त्यात कोणताही धार्मिक उद्देश नव्हता” असे स्पष्टीकरण दिले. तथापि, नेटकऱ्यांनी हे स्पष्टीकरण फेटाळले.

राजकीय विश्लेषकांच्या मते, यादव यांचे हे वक्तव्य २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीयदृष्ट्या घातक ठरू शकते. अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनानंतर सत्ताधारी भाजपने दीपोत्सवाला धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व दिले आहे. अशा पार्श्वभूमीवर हिंदू भावना दुखावणारी टिप्पणी यादव यांच्यासाठी प्रतिकूल ठरू शकते.

अयोध्येतील दीपोत्सवावर टीका करून आणि ख्रिसमसचे कौतुक करून अखिलेश यादव यांनी स्वतःवरच नेटकऱ्यांचा आणि राजकीय विरोधकांचा रोष ओढवून घेतला आहे.

Netizens Slam Akhilesh Yadav for Praising Christmas While Criticising Ayodhya’s Diwali Deepotsav

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023