विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : New era of GST देशभरात आजपासून (२२ सप्टेंबर) जीएसटी 2.0 लागू झाला आहे. जीएसटी परिषदेनं १२ टक्के आणि २८ टक्के स्लॅब रद्द करून नवीन दर फक्त ५ टक्के आणि १८ टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घरगुती वस्तूं पासून औषधे, ऑटोमोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत ३७५ वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत. तर सिगारेट, तंबाखू आणि मद्य या उत्पादनांवर ४० टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे.New era of GST
दूध, कॉफी, बिस्कीट, लोणी, धान्ये, कॉर्नफ्लेक्स, पाण्याचा कॅन, सुकामेवा, फळांचे रस, तूप, आईस्क्रीम, केचअप, स्नॅक्स, चीज, पेस्ट्री, सॉसेज आणि मांस, नारळ पाणी या वस्तू आता स्वस्त मिळतील. सौंदर्यप्रसाधनांमध्ये फेस क्रीम, हेअर ऑइल, शाम्पू, शेव्हिंग क्रीम, टूथब्रश, टॉयलेट सोप यांच्या किमतीतही घट होईल. एसी, टीव्ही, वॉशिंग मशीन, डिशवॉशर यांसारखी इलेक्ट्रॉनिक उत्पादने तसेच औषधांचे दर देखील कमी झाले आहेत.New era of GST
डायग्नोस्टिक किट्स, ग्लूकोमीटर यांसारख्या उपकरणांवरील जीएसटी ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. फार्मसींना निर्देश देण्यात आले आहेत की त्यांनी नवीन दरांनुसार एमआरपी बदलावी किंवा औषधं कमी किमतीत विकाव. तसेच सलून, योगा सेंटर्स आणि फिटनेस क्लब सेवांच्या दरातही घट होणार आहे.
सिमेंटवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणल्याने घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेट क्षेत्राला याचा थेट फायदा होईल. ऑटोमोबाईल्ससाठी सेस टॅक्स ३५-५० टक्क्यांवरून ४० टक्के करण्यात आला आहे. अमूल, एचयूएल, लॉरियल, हिमालया यांसारख्या कंपन्यांनीही त्यांच्या उत्पादनांच्या किंमतीत त्वरित घट जाहीर केली आहे.
पानमसाला, गुटखा, च्युइंग टोबॅको, जरदा, बीडी, सिगारेट, फ्लेवर्ड शीतपेय, प्रीमियम दारू, हाय-एंड गाड्या, आयात केलेल्या आर्मर्ड लक्झरी कार (सरकारी वापर वगळता), कोळसा, लॉटरी आणि काही सेवा या उत्पादनांवर ४० टक्के स्लॅब लागू राहणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या सुधारणा लागू होण्याच्या पूर्वसंध्येला बोलताना म्हणाले, “नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सुरू झालेला हा जीएसटी बचत उत्सव देशातील प्रत्येक कुटुंबाला दिलासा देणारा आहे. गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, महिला आणि तरुणाईला यातून थेट फायदा होणार आहे. देशाच्या विकासाला नवी गती मिळेल आणि व्यापार अधिक सुलभ होईल.”
New era of GST, mobiles, electronics, houses and cars cheaper
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!




















