विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीवरील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनी आता ‘हा गँगरेप नसून एका व्यक्तीनेच बलात्कार केला’ असा दावा केला आहे. याचबरोबर पीडितेचा मित्र वासिफ अली (२३) याला विरोधाभासी विधानांमुळे अटक करण्यात आली आहे. Durgapur Rape Case
ही घटना १० ऑक्टोबरच्या संध्याकाळी घडल्याचे सांगितले जात होते. पीडिता आणि तिचा मित्र वासिफ अली हे दोघे सिटी मेडिकल कॉलेज परिसरातून बाहेर पडले असताना काही जणांनी तिला ओढून जंगलात नेऊन सामूहिक बलात्कार केला, असा आरोप करण्यात आला होता.
या प्रकरणी पोलिसांनी आधीच पाच जणांना अटक केली होती. आपू बौरी, शेख फिरदौस, शेख रियाजुद्दीन, शेख नासिरुद्दीन आणि शेख शफिकूल. हे सर्व तृणमूल काँग्रेसशी संबंधित असल्याचा आरोप करण्यात आला होता.मात्र, पोलिस तपासात आता या सर्व घटनाक्रमात मोठे विसंगतीचे मुद्दे आढळले आहेत.
सीसीटीव्ही दृश्यांनुसार, पीडिता आणि वासिफ अली संध्याकाळी ७:५४ वाजता कॉलेजमधून बाहेर पडताना दिसतात. त्यानंतर अली ८:४२ वाजता एकटाच परतताना, मग पुन्हा ८:४८ वाजता बाहेर पडताना, आणि अखेर ९:२९ वाजता पीडितेसह शांतपणे परतताना दिसतो.
फुटेजमध्ये मुलीचे कपडे अस्ताव्यस्त नव्हते, ती घाबरलेलीही दिसत नव्हती. पोलिसांनी नमूद केले की, “जर एखाद्या महिलेवर जंगलात गँगरेप झाला असता, तर त्याचे काही शारीरिक पुरावे नक्कीच दिसले असते, परंतु येथे तसे नाही.”
असन्सोल–दुर्गापूर पोलीस आयुक्त सुनिल कुमार चौधरी यांनी सांगितले, “आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यानुसार, हा गँगरेप नव्हता. केवळ एकाच व्यक्तीने बलात्कार केला असल्याचे दिसते. उर्वरित आरोपींची भूमिकाही तपासात आहे.”पोलिसांनी सर्व आरोपींचे कपडे जप्त केले असून, डीएनए तपासणी केली जाणार आहे. तसेच, पीडितेचा फोनही पोलिसांनी जप्त केला आहे.
पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल करताना वासिफ अलीचाही संशयित म्हणून उल्लेख केला आहे. त्यांनी सांगितले, “माझ्या मुलीला बाहेर जाण्याची इच्छा नव्हती, पण वासिफने आग्रह केला. त्यानेच हे आधीपासून आखले असावे.” अलीवर आरोप आहे की, हल्ला झाल्यावर तो घटनास्थळावरून पळून गेला.
या प्रकरणात अद्याप तपास सुरू असतानाच सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने पीडितेवरच खोटे बोलण्याचा आरोप केला आहे. पक्षाचे राज्य सरचिटणीस निलंजन दास यांनी म्हटले की, “गँगरेपची कहाणी पीडितेने आपल्या मित्राला वाचवण्यासाठी बनवली आहे.”
काही स्थानिक वृत्तांनुसार, पीडिता आणि वासिफ जंगलात एकटे गेले होते आणि स्थानिक दारुड्यांनी त्यांना पाहून लुटमार केली, त्यानंतर बनावट गँगरेपचा दावा करण्यात आला, अशी अफवा पसरवण्यात आली आहे.
हा प्रकार केवळ पश्चिम बंगालपुरता मर्यादित न राहता ओडिशा सरकारनेही हस्तक्षेप केला आहे, कारण पीडिता ओडिशातील आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माजी यांनी पीडितेच्या वडिलांशी संपर्क साधून,“दोषींना कठोर शिक्षा होणारच,” असे आश्वासन दिले आहे.
New Twist in Durgapur Rape Case!
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा