विशेष प्रतिनिधी
पाटणा : नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत नवा इतिहास रचला आहे. गांधी मैदानावर झालेल्या भव्य समारंभात पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक ज्येष्ठ भाजप नेते उपस्थित होते. Nitish Kumar
सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकूण २६ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेण्यापूर्वी नितीश मंत्रिमंडळातील मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. नवीन सरकारमध्ये भाजपचे 14 मंत्री असतील. तर, जेडीयूमधून 7, लोजपा(रामविलास) पक्षाचे 2, जितन राम मांझी यांच्या नेतृत्वाखालील हिंदुस्तानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) मध्ये प्रत्येकी एक मंत्री असेल. जितन राम मांझी यांचे पुत्र संतोष कुमार सुमन हे त्यांच्या पक्षाकडून मंत्री म्हणून शपथ घेतील, तर उपेंद्र कुशवाह यांचे पुत्र दीपक प्रकाश हे मंत्री म्हणून शपथ घेतील.
बिहारमधील नवीन मंत्री पुढीलप्रमाणे : सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा विजय कुमार चौधरी, बिजेंद्र प्रसाद यादव, श्रवण कुमार, मंगल पांडेय, डॉ. दिलीप जायसवाल, अशोक चौधरी, लेसी सिंहमदन सहनी , नितिन नवीन, रामकृपाल यादव, संतोष कुमार सुमन, सुनील कुमार, मोहम्मद जमा खान, संजय सिंह टायगर, अरुण शंकर प्रसाद, सुरेंद्र मेहता, नारायण प्रसादर, लखेंद्र कुमार, रोशन श्रेयसी सिंह, डॉ. प्रमोद कुमार, संजय कुमार, दीपक प्रकाश
हरियाणा, आसाम, गुजरात, मेघालय, उत्तर प्रदेश, नागालँड, ओडिशा, दिल्ली आणि राजस्थानचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते. चिराग पासवान यांनी व्यासपीठावर मांझी आणि जेपी नड्डा यांना चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
यावेळी नितीश यांच्या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. रामकृपाल यादव आणि श्रेयसी सिंह यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. चिराग यांच्या पक्षातील दोन आमदारांना मंत्री बनवण्यात आले आहे, ज्यात संजय सिंह यांचाही समावेश आहे. संजय सिंह यांनी लालू यादव यांचे पुत्र तेज प्रताप यांचा पराभव करून महुआ येथून निवडणूक जिंकली होती.
Nitish Kumar creates history, takes oath as Bihar Chief Minister for the tenth time
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश



















