विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कर्नाटकातील महादेवपुरा ही फक्त एक जागा नाही तर अनेक जागा आहेत जिथे मतदार याद्यांमध्ये छेडछाड केली जात आहे. हे राष्ट्रीय पातळीवर पद्धतशीरपणे केले जात आहे, असा आराेप काॅंग्रेसचे खासदार आणि लाेकसभेतील विराेधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी म्हणाले, निवडणूक आयोगाला हे माहिती आहे आणि आम्हालाही. पूर्वी कोणताही पुरावा नव्हता, पण आता आमच्याकडे पुरावे आहेत. आम्ही संविधानाचे रक्षण करत आहोत. एक व्यक्ती एक मत हा संविधानाचा पाया आहे. ‘एक व्यक्ती एक मत’ लागू करणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे, परंतु त्यांनी तसे केले नाही. ही संविधान वाचवण्याची लढाई आहे. ही एक व्यक्ती-एक मताची लढाई आहे, म्हणून आम्हाला स्वच्छ मतदार यादी हवी आहे.
बिहारच्या अद्ययावत मतदार यादीत १२४ वर्षीय ‘पहिल्यांदाच मतदार’ झालेल्या मिंता देवीच्या प्रश्नावर राहुल म्हणाले- हो, मी त्यांच्याबद्दल ऐकले आहे. अशी एक नाही तर अमर्यादित प्रकरणे आहेत. चित्र अद्याप समोर आलेले नाही.
सोमवारी मतदार पडताळणी आणि निवडणुकीत मत चोरीच्या आरोपांवरून 300 विरोधी खासदारांनी संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला हाेता. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी खासदारांना ताब्यात घेण्यात आले हाेते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी मतदार यादीतील कथित घाेळ उघड करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली हाेती. यावेली १ तास ११ मिनिटांचे २२ पानांचे सादरीकरण दिले. राहुल यांनी कर्नाटकची मतदार यादी स्क्रीनवर दाखवली आणि मतदार यादीत संशयास्पद मतदार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्राचे निकाल पाहिल्यानंतर निवडणूक चोरीला गेल्याचा आमचा संशय पक्का झाला. मशीन रीडेबल मतदार यादी न देऊन, आम्हाला खात्री पटली की निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करून महाराष्ट्राची निवडणूक चोरली आहे, असा आराेप त्यांनी केला हाेता.
निवडणूक आयोगाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मत चोरीचे दावे खरे वाटत असतील तर त्यांनी प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगितले आहे. जर त्यांना त्यांच्या दाव्यांवर विश्वास नसेल तर त्यांनी देशाची माफी मागावी, असे म्हटले हाेते.
Not Just One, Voter List Manipulation at Multiple Locations Nationwide: Rahul Gandhi Alleges
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला