YouTuber Priyanka Senapati : ज्योती मल्होत्रा हेरगिरी प्रकरणात ओडिशाची यूट्यूबर प्रियांका सेनापती तपासाच्या रडारवर

YouTuber Priyanka Senapati : ज्योती मल्होत्रा हेरगिरी प्रकरणात ओडिशाची यूट्यूबर प्रियांका सेनापती तपासाच्या रडारवर

YouTuber Priyanka Senapati

विशेष प्रतिनिधी

पुरी : YouTuber Priyanka Senapati पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्राशी संबंध असल्यामुळे ओडिशातील युट्युबर प्रियांका सेनापती ही सध्या गुप्तचर विभागाच्या तपासाच्या रडारवर आली आहे. पाकिस्तानातील करतारपूर कॉरिडॉरला भेट दिल्यामुळे आणि ज्योतीसोबत मैत्री असल्यामुळे तिच्या विरोधात तपास सुरू झाला आहे.YouTuber Priyanka Senapati

पुरीचे पोलीस अधीक्षक विनीत अग्रवाल यांनी सांगितले की, प्रियांकाचा ज्योतीसोबतचा संबंध, तसेच तिची पाकिस्तान यात्रा या सर्व बाबींचा सखोल तपास सुरू आहे. प्रियांकाने काही महिन्यांपूर्वी आपल्या युट्युब चॅनेल ‘Prii_vlogs’ वर “Odia Girl in Pakistan | Kartarpur Corridor Guide | Odia Vlog” हा व्हिडिओ पोस्ट केला होता.

प्रियांकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहीत स्पष्टीकरण दिलं की, “ज्योती ही केवळ माझी मैत्रीण होती आणि तिच्याशी ओळख युट्युबमुळे झाली होती. ती शत्रु देशासाठी हेरगिरी करत होती, हे माहिती असते तर मी तिच्याशी संपर्कात राहिले नसते. देश सर्वप्रथम आहे. जय हिंद!”

प्रियांका सध्या पुरी येथील तिच्या राहत्या घरी आहे आणि अद्याप तिच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. तिच्या वडिलांनीही सांगितले की, “ज्योती सप्टेंबर 2024 मध्ये पुरीला आली होती, पण ती आमच्या घरी आली नव्हती. आम्हाला तिच्या हेरगिरीच्या प्रकाराबद्दल आता कळले. प्रियांकाने करतारपूरला इतर एका व्यक्तीसह प्रवास केला होता तिच्याकडे संबंधित कागदपत्रेही होती. अनेक युट्युबर्स करतारपूरला जातात. ती एक विद्यार्थी आहे आणि ज्योतीच्या देशविरोधी कारवायांची तिला माहिती नव्हती.

सध्या पोलीस ज्योती मल्होत्राच्या पुरीतील हालचालींचा मागोवा घेत असून, ती कोणाशी संशयास्पद संपर्कात होती का, याचा तपास सुरू आहे.

ज्योती मल्होत्रा हिला हरियाणाच्या पोलिसांनी अटक केली असून, ती दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात कार्यरत असलेल्या पाकिस्तानी कर्मचाऱ्याच्या संपर्कात होती, असे समोर आले आहे. १३ मे रोजी भारताने संबंधित पाकिस्तानी कर्मचाऱ्याला हेरगिरीप्रकरणी देशातून हाकलून दिले होते.

Odisha YouTuber Priyanka Senapati on investigation radar in Jyoti Malhotra spying case

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023