विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Operation Sindoor भारताच्या ऑपरेशन सिंदूरने संपूर्ण जगासमोर देशाची लष्करी ताकद, रणनीतिक कौशल्य आणि तांत्रिक प्रगतीचे दर्शन घडवले. भारतीय लष्कराने हवाई संरक्षण प्रणालीच्या साहाय्याने आपल्या लष्करी तळांची व धोरणात्मक ठिकाणांची यशस्वीपणे रक्षा केली. दुसरीकडे, पाकिस्तानने गाठत भारतीय सैन्य व नागरी ठिकाणांवर ड्रोन, क्षेपणास्त्रं आणि रॉकेट हल्ले चढवले. मात्र भारताने अत्यंत अचूक हल्ल्यांतून केवळ दहशतवादी तळांनाच लक्ष्य करत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.Operation Sindoor
८ मे रोजी पाकिस्तानने जम्मू, अमृतसर, पठाणकोट आणि जैसलमेरसारख्या अनेक भारतीय शहरांना लक्ष्य करत ड्रोन स्वार्मद्वारे हल्ला केला. या हल्ल्यांचा उद्देश भारताच्या लष्करी तळांबरोबरच नागरी वस्त्यांवरही हानी पोहोचवण्याचा होता. हा हल्ला इस्रायलविरुद्ध हमासने वापरलेल्या तंत्रावर आधारित होता .एकाच वेळी अनेक हल्ले करून हवाई संरक्षण यंत्रणेला चकवण्याचा प्रयत्न. मात्र भारताने अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणांचा वापर करून हे सर्व हल्ले निष्फळ ठरवले.
भारताच्या अत्याधुनिक आकाशतीर हवाई संरक्षण प्रणाली आणि रशियाकडून खरेदी केलेली S-400 ‘सुदर्शन चक्र’ प्रणाली यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आकाशतीर प्रणालीने पश्चिम सीमेवर एक मजबूत हवाई कवच उभारले आहे. ही प्रणाली विविध रडार स्त्रोतांमधून थेट डाटा एकत्रित करून आक्रमण करणाऱ्या प्रत्येक क्षेपणास्त्रावर अचूक लक्ष्य ठेवते आणि त्याचा नायनाट करते.
आकाशतीर प्रणाली ही BEL (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड) ने भारतीय लष्करासाठी विकसित केलेली एक अत्याधुनिक एअर डिफेन्स कंट्रोल अँड रिपोर्टिंग सिस्टीम (ADCRS) आहे. २०२४ पासून या प्रणालीचे टप्प्याटप्प्याने लष्करात समावेश सुरू झाला. ही प्रणाली सीमावर्ती भागांतील कमी उंचीवरील हवाई हल्ले शोधून त्यांचा त्वरित प्रतिकार करण्यासाठी वापरली जाते. ही प्रणाली अनेक रडार्स, AWACS, AEW&C सारख्या हवाई तंत्रज्ञानातून मिळालेला डेटा एकत्र करून एक एकात्मिक ऑपरेशनल चित्र तयार करते, ज्यामुळे स्वयंचलित आणि त्वरित निर्णय घेता येतात.
आकाशतीर प्रणाली ही भारताच्या हवाई संरक्षण जाळ्याची डिजिटल मज्जासंस्था ठरली आहे. याच्या मदतीने भारताने पाकिस्तानकडून डागण्यात आलेल्या प्रत्येक क्षेपणास्त्राचा यशस्वीपणे प्रतिकार करत, भारताच्या नागरी आणि लष्करी मालमत्तांचे संरक्षण केले.
Operation Sindoor boosts India’s indigenous defense technology
महत्वाच्या बातम्या
- सी-व्होटर सर्व्हेचा निष्कर्ष : देशवासीयांचा भारतीय लष्करावर दृढ विश्वास, शस्त्रसंधीलाही दिला मोठा पाठिंबा
- Prime Minister Narendra Modi : आदमपूर एअरबेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट आणि पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांची पोलखोल
- Sharad Pawar : शरद पवार गटाची बैठक अन् अंकुश काकडे यांचा एकत्रिकरणाबाबत विराेधाचा सूर
- Tiranga Yatra : ऑपरेशन सिंदूरचे यश साजरे करण्यासाठी भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा