विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक प्रहार केला. या धाडसी मोहिमेची माहिती देण्यासाठी भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासह पत्रकार परिषद घेतली.
हा क्षण लष्कराच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरला, कारण दहशतवादाविरोधातील लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर महिलांनी प्रथमच राष्ट्रीय पातळीवर पत्रकार परिषदेत अग्रस्थान घेतले.
कॉर्प्स ऑफ सिग्नल्समध्ये कार्यरत असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांचे सैन्यसेवे मधील योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे.२०१६ मध्ये त्यांनी एक्सरसाइज फोर्स १८ या आंतरराष्ट्रीय युद्धसरावात भारताच्या सैन्याचे नेतृत्व करणारी पहिली भारतीय महिला अधिकारी होण्याचा मान मिळवला. यामध्ये अमेरिका, रशिया, चीन, आणि ASEAN देशांसह एकूण १८ देश सहभागी झाले होते. हा सराव पुण्यात आयोजित करण्यात आला होता आणि त्याला भारतातील सर्वात मोठ्या विदेशी लष्करी सरावाचे महत्त्व प्राप्त झाले होते.
त्यानंतर त्यांनी २००६ मध्ये काँगोमधील संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षक म्हणून काम केले. तिथे त्यांनी युद्धग्रस्त भागातील स्त्रिया आणि बालकांच्या सुरक्षेसाठी योगदान दिले.
ऑपरेशन पराक्रम, ईशान्य भारतातील पूरग्रस्त भागातील मदतकार्य, तसेच नवी दिल्लीतील UN Peacekeeping Centre येथे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी सेवा बजावली आहे.
त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना सेना मुख्यालय आणि विविध सैनिकी प्राधिकरणांकडून गौरवपत्रे व सन्मान देण्यात आले आहेत. सेवा, शिस्त, नेतृत्व, आणि मानवी मूल्यांचे प्रतीक म्हणून कर्नल कुरेशी यांचा आदर केला जातो.
विंग कमांडर व्योमिका सिंग यांचा बायोडेटा जाहीर करण्यात आलेला नसला, तरी देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्वाच्या ऑपरेशनची माहिती देण्यासाठी निवड होणे ही बाबच त्यांच्या वरिष्ठ पदाची साक्ष देते.भारतीय हवाई दलाने गेल्या काही वर्षांत महिला अधिकाऱ्यांना फायटर पायलट्सपासून ते मिशन प्लॅनिंग आणि ऑपरेशन्सपर्यंत विविध क्षेत्रात संधी दिल्या आहेत. विंग कमांडर व्योमिका सिंग यांचे प्रतिनिधित्व हे त्याचेच निदर्शक आहे.
Operation Sindoor Colonel Sophia Qureshi and Wing Commander Vyomika Singh are strong voices of women in the army
महत्वाच्या बातम्या
- Operation sindoor वर मोदींचे मॉनिटरिंग; जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले!!
- Operation sindoor : पाकिस्तानात 3 ठिकाणी 9 टार्गेटवर भारताचा क्षेपणास्त्र हल्ला; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला!!
- Devendra Fadnavis : अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Mahadev Jankar : भाजपने विचारले नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली, महादेव जानकारांची खंत