विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. म्हणजेच ७ मे रोजी पाकिस्तानातील ९ ठिकाणी झालेल्या हवाई हल्ल्यानंतरही कारवाई थांबलेली नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी गुरुवारी स्पष्ट केले आहे.
दिल्लीतील संसदेच्या कक्षात सुमारे दीड तास सर्वपक्षीय बैठक झाली. ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते.
बैठकीपूर्वी काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीची मागणी केली होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, या संकटात आम्ही देश आणि सरकारसोबत आहोत. सरकारवर टीका करण्याची गरज नाही.
राहुल गांधी म्हणाले, ‘आम्ही सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आहे. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले त्याप्रमाणे, त्यांनी सरकारने)म्हटले की काही गोष्टी आहेत ज्यांवर आपण चर्चा करू इच्छित नाही.
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूरसाठी मी आपल्या सशस्त्र दलांचे आणि सरकारचे कौतुक केले आहे. आपण रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनेविरुद्ध जागतिक मोहीम सुरू केली पाहिजे.
विरोधकांनी सांगितले की ते सरकारसोबत आहेत. विरोधी पक्षाच्या खासदारांनी दहशतवादी छावण्या नष्ट करण्याची मागणी केली. सरकारने दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे ते म्हणाले. बैठकीनंतर राहुल गांधी म्हणाले सरकारच्या प्रत्येक कृतीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.
Operation Sindoor is still ongoing, Defence Minister Rajnath Singh clarified
महत्वाच्या बातम्या
- Operation sindoor वर मोदींचे मॉनिटरिंग; जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले!!
- Operation sindoor : पाकिस्तानात 3 ठिकाणी 9 टार्गेटवर भारताचा क्षेपणास्त्र हल्ला; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला!!
- Devendra Fadnavis : अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Mahadev Jankar : भाजपने विचारले नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली, महादेव जानकारांची खंत