Rahul Gandhi : मोदींची प्रतिमा वाचवण्यासाठीच ‘ऑपरेशन सिंदूर’, राहुल गांधींचा आरोप

Rahul Gandhi : मोदींची प्रतिमा वाचवण्यासाठीच ‘ऑपरेशन सिंदूर’, राहुल गांधींचा आरोप

Rahul Gandhi

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: ‘Rahul Gandhi ऑपरेशन सिंदूर’चा उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा वाचवणे हाच होता. हे सर्व पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिमा वाचवण्यासाठी करण्यात आलं. मोदींची प्रतिमा वाचण्यासाठी सैन्यदलांचा वापर करण्यात आला, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.Rahul Gandhi

संसदेच्या अधिवेशनात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापले आहे. राहुल गांधी लोकसभेत सरकारवर आरोप करतानाते म्हणाले “संरक्षण मंत्री सभागृहात म्हणाले की, आम्ही पाकिस्तानला फक्त दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि आम्हाला एस्केलेशन नको आहे असे सांगितले. याचा अर्थ असा की आम्ही आधीच आमचा उद्देश शत्रुला सांगितला. आमच्यात युद्ध करण्याचं धाडस नाही हेच एकप्रकारे शत्रुला सांगितले. आम्ही सैन्याचे हात बांधून त्यांना युद्धाला पाठवलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानमध्ये युद्धबंदी घडवून आणल्याचा 29 वेळा केलेला दावा खोटा असल्याचे पंतप्रधान मोदींनी सभागृहात सांगावे.Rahul Gandhi

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना राहुल गांधी म्हणाले, सरकारने हवाई दलाला केवळ दहशतवादी तळांवर हल्ला करण्यासाठी पाठवले, परंतु पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ला करण्यापासून त्यांना रोखले. सरकारच्या या चुकीच्या रणनीतीमुळे भारताने लढाऊ विमाने गमावली. “वायुदलाच्या क्षमतेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे, पण सरकारने आपल्या वैमानिकांचे हात बांधले. चूक वायुदलाची नाही, चूक सरकारची आहे.

1971 च्या युद्धाचा संदर्भ देत इंदिरा गांधींच्या धैर्याची आठवण करून देताना राहुल गांधी म्हणाले, “1971 मध्ये आपण अमेरिकेचे ऐकले नाही. एक लाख पाकिस्तानी सैनिकांनी भारतासमोर आत्मसमर्पण केले. इंदिरा गांधींमध्ये जितकी हिंमत होती, त्याच्या अर्धी जरी हिंमत असेल तर ट्रम्प यांना सभागृहात ‘खोटारडे’ म्हणावे. ट्रम्प यांनी 29 वेळा सांगितले की, त्यांनी युद्धबंदी घडवून आणली. जर नरेंद्र मोदींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी सभागृहात सांगावे की ट्रम्प खोटे बोलत आहेत.

राहुल गांधींनी भारताच्या परराष्ट्र धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “काही दिवसांपूर्वी मी सभागृहात म्हटले होते की, भारताच्या परराष्ट्र धोरणासमोरील सर्वात मोठे आव्हान पाकिस्तान आणि चीनला वेगळे ठेवणे हे राहिले आहे. पण आपण यात अपयशी ठरलो आहोत आणि त्यांनी भारतीय परराष्ट्र धोरण उद्ध्वस्त केले आहे,” असे ते म्हणाले.

सरकारला वाटले की ते पाकिस्तानशी लढत आहेत, पण जेव्हा ते आले तेव्हा त्यांना समजले की ते पाकिस्तान आणि चीनशी लढत आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर ट्रम्प यांच्यासोबत जेवण करण्यासाठी बसतात, हे मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश नाही का? असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

‘Operation Sindoor’ is to save Modi’s image, alleges Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023