Operation Sindoor ऑपरेशन सिंदूरचा पाकिस्तानलाच नव्हे चीनलाही दणका, पाकिस्तानची चिनी हवाई संरक्षण यंत्रणा २३ मिनिटांत जॅम

Operation Sindoor ऑपरेशन सिंदूरचा पाकिस्तानलाच नव्हे चीनलाही दणका, पाकिस्तानची चिनी हवाई संरक्षण यंत्रणा २३ मिनिटांत जॅम

Operation Sindoor

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पाकिस्तानातल्या दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर या मोहिमेमुळे संपूर्ण जगाला भारताच्या लष्करी क्षमतेचा प्रत्यय आला. यामुळे पाकिस्तानला तर दणका बसलाच आहे पण चीनलाही भारतीय लष्कराच्या सामर्थ्याने हादरविले आहे. Operation Sindoor

ऑपरेशन सिंदूर या ऑपरेशनमध्ये भारताने आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडता पाकिस्तानातील दहशतवादी तळांना लक्ष्य करत निर्णायक कारवाई केली. विशेष बाब म्हणजे पाकिस्तानची चीनकडून मिळालेली हवाई संरक्षण प्रणाली भारतीय तंत्रज्ञानाने अवघ्या २३ मिनिटांत निष्प्रभ करण्यात आली.
ऑपरेशन सिंदूरनं केवळ सामरिक विजय मिळवला नाही, तर भारतीय संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेचा डंका वाजवला आहे. ड्रोन युद्ध, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, आणि सुसंगत हवाई संरक्षण व्यवस्थेद्वारे भारताने अत्यंत अचूकतेने कारवाई केली.

७ आणि ८ मेच्या रात्री पाकिस्तानने अमृतसर, जम्मू, पठाणकोट, आदमपूर, लुधियाना, चंदीगड यांसारख्या उत्तर व पश्चिम भारतातील अनेक लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैन्याने इंटीग्रेटेड काउंटर UAS ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टम्सच्या साह्याने हे हल्ले निष्फळ ठरवले.

८ मे रोजी भारताने प्रतिहल्ल्यात लाहोरसह पाकिस्तानातील अनेक भागांतील हवाई संरक्षण रडार्स आणि एअर डिफेन्स सिस्टम्सवर अचूक हल्ले केले. या कारवाईत पाकिस्तानचे प्रमुख हवाई संरक्षण तळ निष्क्रिय झाले.

भारताने या मोहिमेत अकाश मिसाईल सिस्टम, Pechora, OSA-AK, LLAD गन, यांसारखी स्वदेशी व battle-tested प्रणाली वापरली. अकाश मिसाईल सिस्टम ही लहान पल्ल्याची मिसाईल असून, एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर autonomous किंवा group mode मध्ये हल्ला करू शकते. यामध्ये ECCM (Electronic Counter-Counter Measures) सारखी प्रगत तंत्रज्ञान यंत्रणा आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय वायुदलाच्या Integrated Air Command and Control System (IACCS) ने लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या सर्व यंत्रणांना एकत्र आणत आधुनिक युद्धशैलीचं उत्तम उदाहरण सादर केले.

भारताच्या अचूक हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या नूर खान आणि रहिमयार खान हवाई तळांवर Loitering Munitions चा वापर करण्यात आला. या ‘सुसाइड ड्रोन’ स्वरूपाच्या अस्त्रांनी अत्यंत अचूकपणे रडार आणि क्षेपणास्त्र प्रणाली उद्ध्वस्त केली. भारताने इस्त्रायलच्या Harop ड्रोनचा वापर करून पाकिस्तानचे बहुतेक तळ निष्क्रिय केले.

Operation Sindoor not only hit Pakistan but also China, Pakistan’s Chinese air defense system jammed in 23 minutes

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023