विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर’, पुलवामा, उरी सर्व निवडणुकीसाठीच घडविण्यात आले. मोदी सरकारने पाकिस्तानवरील कारवाई निवडणूक जिंकण्यासाठी केली असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी केला आहे. Yashwant Sinha
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्याशी संवाद साधताना सिन्हा म्हणाले, पुलवामा हल्ल्यानंतर २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक झाली. आता पहलगाम हल्ल्यानंतर बिहार निवडणुका येत आहेत. त्यामुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांचा संबंध निवडणुकांशी असल्याचे सूचित होत असल्याचे त्यांनी म्हटले.
मोदी सरकार राष्ट्रीय सुरक्षेचा वापर मतांसाठी करते. पंतप्रधान मोदी यांनी पुलवामा आणि उरी हल्ल्यांच्या नावावर मतं मागितली. मात्र सरकारने या हल्ल्यांबाबत कोणतीही पारदर्शकता दाखवलेली नाही. पुलवामा हल्ल्याची माहिती देण्यात आलेली नाही. पहलगाम हल्ल्याचे तपशील देखील उघड केले जाणार नाहीत, असा दावा सिन्हा यांनी केला.
भारताला ५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेची स्वप्ने दाखवणाऱ्या मोदी सरकारवर टीका करताना सिन्हा म्हणाले, “माझ्या मतदारसंघातील लोकांना ‘ट्रिलियन’ या शब्दाचा अर्थही माहीत नाही. कपिल सिब्बल यांनीही या मुद्द्यावर सिन्हांचे समर्थन करत म्हटले की, जर प्रति व्यक्ति उत्पन्न वाढत नसेल, तर ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था निरर्थक आहे.
सिन्हा यांनी परराष्ट्र धोरणावर मोदी सरकारवर टीका करताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना “शोभेचे परराष्ट्र सचिव” असे संबोधले. मोदींनी संपूर्ण परराष्ट्र धोरण स्वतःकडे केंद्रीत केले असल्याचा आरोप त्यांनी केला.
पंतप्रधान मोदींच्या सततच्या परदेश दौऱ्यांवर टीका करताना सिन्हा म्हणाले, “टिंबकटू वगळता जगातील प्रत्येक देशात ते गेले असतील; पण त्याचा काही उपयोग झालेला नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत (IMF) पाकिस्तानच्या कर्ज विनंतीवर मतदानावेळी एकही देश भारतासोबत उभा राहिला नाही. केवळ तैवान, तालिबान आणि इस्त्रायल हेच देश भारताच्या परराष्ट्र धोरणाचे समर्थक आहेत.
काश्मीरच्या संदर्भात बोलताना सिन्हा यांनी मोदी काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करून काश्मीरचे राज्यपद पुन्हा बहाल करण्याची मागणी केली.
Operation Sindoor’, Pulwama, Uri all for elections, alleges Yashwant Sinha
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर