विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरची इतिहासात एक उदाहरण म्हणून नोंद होईल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित केले. त्या म्हणाल्या की, या वर्षी आपल्याला दहशतवादाचा सामना सहन करावा लागला. काश्मीरला भेट देण्यासाठी गेलेल्या निष्पाप नागरिकांची हत्या, ही भ्याड आणि पूर्णपणे अमानवीय होती. परंतु भारताने या दहशतवादी हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले आहे की, जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा आपले सशस्त्र दल कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास पूर्णपणे सक्षम असतात.
धोरणात्मक स्पष्टता आणि तांत्रिक कार्यक्षमतेने, आपल्या सैन्याने सीमेपलीकडील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. दहशतवादाविरुद्ध मानवतेच्या लढाईत ऑपरेशन सिंदूरची इतिहासात एक उदाहरण म्हणून नोंद होईल, असा माझा विश्वास असल्याचे मत मुर्मू यांनी व्यक्त केले.
राष्ट्रपती म्हणाल्या की, आमची एकता ही आमच्या प्रत्युत्तराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य होते. ही एकता आम्हाला विभाजित पाहू इच्छिणाऱ्या सर्व घटकांना सर्वात योग्य उत्तर आहे. भारताचा दृष्टिकोन स्पष्ट करण्यासाठी अनेक देशांमध्ये गेलेल्या संसद सदस्यांच्या बहुपक्षीय शिष्टमंडळांमध्येही ही एकता दिसून आली. जागतिक समुदायाने भारताच्या धोरणाची दखल घेतली आहे की, आम्ही आक्रमक बनणार नाही, परंतु आमच्या नागरिकांचे रक्षण करण्यासाठी प्रत्युत्तर देण्यास मागेपुढे पाहणार नाही, असेही मुर्मू म्हणाल्या.
राष्ट्रपती म्हणाल्या की, ऑपरेशन सिंदूर ही संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भर भारत मोहिमेची’ चाचणी घेण्याची संधी होती. त्यामुळे आता हे सिद्ध झाले आहे की, आम्ही योग्य मार्गावर आहोत. आमचे स्वदेशी उत्पादन एका निर्णायक पातळीवर पोहोचले आहे, जिथे आम्ही आमच्या अनेक सुरक्षा गरजा पूर्ण करण्यात स्वावलंबी झालो आहोत. ही कामगिरी स्वतंत्र भारताच्या संरक्षण इतिहासात एका नवीन अध्यायाची सुरुवात करतात.
राष्ट्रपती म्हणाल्या की, आपल्या देशातील तरुणांना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी अनुकूल परिस्थिती मिळाली आहे. तरुण प्रतिभेच्या उर्जेने बळकट होऊन, आपला अंतराळ कार्यक्रम अभूतपूर्वपणे विस्तारला आहे. शुभांशू शुक्लाच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या प्रवासाने संपूर्ण पिढीला मोठे स्वप्न पाहण्याची प्रेरणा दिली आहे. भारताच्या आगामी मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम ‘गगनयान’साठी हा अंतराळ प्रवास अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वासही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी व्यक्त केला.
Operation Sindoor will be recorded as an example in history; Draupadi Murmu
- महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला