विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या निर्णायक हवाई कारवाईस विरोधी पक्षांनाही पाठिंबा दिला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आदींनी या धाडसी कारवाईचं कौतुक करत भारतीय लष्कराच्या आणि केंद्र सरकारच्या पाठीशी उभं असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. धर्म विचारून निवडक हिंदू पर्यटकांवर गोळ्या झाडण्यात आल्या, यात अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती आणि पाकिस्तानला कठोर प्रत्युत्तर द्यावे, अशी जोरदार मागणी सुरू झाली होती.
बुधवारी (७ मे) मध्यरात्री १.३० वाजता भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील नऊ प्रमुख दहशतवादी केंद्रांवर हल्ला केला. या कारवाईत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्ल्यानंतर राहुल गांधी यांनी X या सोशल मीडिया अकाउंटवर वर पोस्ट करत म्हटलं,“आपल्या सैन्याचा अभिमान आहे. जय हिंद!”
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनीदेखील सैन्याच्या कामगिरीचं समर्थन करत लिहिलं, “आपल्या जवानांवर देशवासीयांचा संपूर्ण विश्वास आहे. आम्ही सरकार आणि लष्कराच्या पाठीशी ठाम उभे आहोत.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे कौतुक केले. ते म्हणाले, भारताच्या सार्वभौमत्वासाठी आपल्या छातीवर गोळ्या झेलणाऱ्या जवानांवर देशवासीयांचा विश्वास सार्थ ठरवणारी ही कारवाई आहे. या स्ट्राईकमध्ये पाक लष्कर किंवा नागरिकांना धक्का न लावता, दहशतवाद्यांवरच अचूक हल्ला करण्यात आला. हे नियोजन आणि अचूकतेचे उदाहरण आहे. भारतीय जवानांचं मनःपूर्वक अभिनंदन!
Opposition also supports ‘Operation Sindoor’, many leaders including Rahul Gandhi, Sharad Pawar praise the Army
महत्वाच्या बातम्या
- Operation sindoor वर मोदींचे मॉनिटरिंग; जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले!!
- Operation sindoor : पाकिस्तानात 3 ठिकाणी 9 टार्गेटवर भारताचा क्षेपणास्त्र हल्ला; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला!!
- Devendra Fadnavis : अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Mahadev Jankar : भाजपने विचारले नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली, महादेव जानकारांची खंत