विशेष प्रतिनिधी
मुंगेर (बिहार) : Chirag Paswan केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान यांनी शनिवारी एक खळबळजनक आरोप करत म्हटले की, “माझ्या विरोधकांनी मला बॉम्बने उडवण्याचा कट रचला आहे.” बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात झालेल्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी हा आरोप केला. यावर्षी बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा गौप्यस्फोट महत्त्वाचा मानला जात आहे.Chirag Paswan
पासवान म्हणाले, “मला फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण आता मला संपवण्यासाठी नवीन कट रचण्यात आला आहे. पण माझे विरोधक विसरतात की चिराग पासवान हा वाघाचा पिल्ला आहे. मला झुकता येत नाही, आणि कोणतीही धमकी मला घाबरवू शकत नाही.”Chirag Paswan
चिराग यांनी त्यांचे काका पशुपती कुमार पारस यांच्यावरही टीका केली आणि अप्रत्यक्षपणे राष्ट्रीय जनता दलावर (आरजेडी) निशाणा साधला. पारस यांच्या गटाने आरजेडीशी जवळीक साधण्याची तयारी दर्शवली आहे. ते म्हणाले, “‘बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट’ हा माझा नारा अनेकांच्या जिव्हारी लागला आहे कारण तो त्यांच्या जातीय राजकारणावर घाव घालतो. जे राज्याला मागे ठेवून, गोरगरीब जनतेला अंधारात ठेवून सत्तेत होते, तेच आता पुन्हा खोटी आश्वासने देऊन मतं मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.”
चिराग यांना काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली होती.
Opposition’s plot to blow me up with a bomb, Chirag Paswan reveals
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये आल्याने चर्चांना उधाण
- ते राजकारणाच्या कचराकुंडीत, सोबत जाईल तोही संपेल, मनोज तिवारी यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
- Vijay Wadettiwar : शिंदे सरकार हनीट्रॅपमुळे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा
- Nitesh Rane : खरा शकुनी मामा मातोश्रीवर, राज ठाकरे यांच्या सभेवरून नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा