विशेष प्रतिनिधी
तिरुची (तामिळनाडू): तामिळनाडूमध्ये धर्मभावनांना धक्का देणारा प्रकार उघडकीस आला आहे. काही अतिरेकी युवकांनी प्रभू श्रीरामांचा पुतळा जाळून ‘रावण जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे.
ही घटना तिरुची जिल्ह्यातील थिरुवेरुंबूर तालुक्यातील गुंटूर गावात घडली आहे. ‘फिफ्थ तामिळ संगम’ या फेसबुक पेजवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये प्रभू श्रीरामांचा पुतळा चपलेची माळ घालून पेटवताना काही पुरुष दिसतात. व्हिडिओच्या शेवटी दहा डोकी असलेला रावण वीणा हातात धरून उभा असल्याचे चित्र दाखवण्यात आले आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विविध हिंदू संघटनांनी संताप व्यक्त केला. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तिरुची जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले.
The barbaric act of burning Lord Shri Ram's effigy is a direct continuation of the vile legacy started by E.V. Ramasamy, who garlanded #LordRam with slippers. The poison of Hindu-hatred sown then is being harvested now under the DMK regime is highly condemnable.
This is not a… pic.twitter.com/sutaWj0Jwk
— Dr.SG Suryah (@SuryahSG) October 2, 2025
दरम्यान, पोलिसांनी त्वरीत कारवाई करत या घटनेविषयी गुन्हा दाखल केला आहे. बीएनएसच्या कलम १९२, १९६(१)(अ), १९७, २९९, ३०२ आणि ३५३(२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींची नावे टी. पी. शंकर, टी. पी. राजलिंगम, नेपोलियन आणि वसंतकुमार अशी आहेत. शंकरला २ ऑक्टोबर रोजी, तर उर्वरित तीन आरोपींना ३ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.
या घटनेनंतर राज्यात धार्मिक द्वेष पसरविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विविध संघटनांनी केला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
Outrageous incident in Tamil Nadu: Lord Shri Ram’s statue burnt, ‘Ravana Zindabad’ slogans raised, 4 arrested
महत्वाच्या बातम्या
- Ravindra Dhangekar चंद्रकांतदादा गुन्हेगारांना पाठीशी का घालतात, रवींद्र धंगेकरांचा थेट सवाल
 - Uddhav Thackeray : मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? आत्मचिंतन करा : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
 - Congress : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करणार
 - Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, तासभर चर्चा झाल्याने राजकीय खळबळ
 
				
													



















