विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : OTT platforms भारत आणि पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशाच्या सायबर आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वरील ८,००० हून अधिक अकाउंट्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. हे अकाउंट्स भारतविरोधी प्रचार, बनावट माहिती, पाकिस्तानसमर्थक मजकूर आणि व्हिडिओ पसरवत असल्याचे आढळून आले आहे.OTT platforms
या कारवाईत आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांचेही काही X अकाउंट्स समाविष्ट असल्याची माहिती समोर आली आहे. X च्या ग्लोबल गव्हर्नमेंट अफेयर्स विभागाने यासंदर्भात अधिकृत माहिती देत म्हटले आहे की, “भारत सरकारने आम्हाला काही अकाउंट्स आणि पोस्ट्स हटवण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही यावर सहमत नाही, मात्र कायद्याच्या पालनासाठी या पोस्ट्स भारतात दाखवल्या जाणार नाहीत.”
सरकारच्या म्हणण्यानुसार, काही सोशल मीडिया अकाउंट्स भारतात जातीय तणाव, अस्थिरता व चुकीची माहिती पसरवत आहेत. हे अकाउंट्स पाकिस्तानच्या बाजूने प्रचार करत असून, भारतीय लष्कर व सुरक्षा यंत्रणांविरुद्ध दिशाभूल करणाऱ्या पोस्ट्स करत आहेत. त्यामुळे IT कायदा 2021 अंतर्गत या अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली आहे.
याच अनुषंगाने सरकारने सर्व ओटीटी आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मना पाकिस्तानशी संबंधित सर्व प्रकारचा कंटेंट तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निर्देशानुसार, खालील कंटेंटवर बंदी लागू करण्यात आली आहे:
पाकिस्तानात बनवलेली वेबसिरीज, चित्रपट व माहितीपट
पाकिस्तानी कलाकारांचे गाणी, अल्बम्स व ट्रॅक्स (जसे आतिफ असलम, राहत फतेह अली खान यांचे)
पॉडकास्ट्स, ऑडिओ शो आणि कोणताही पाकिस्तानी आवाज-आधारित कंटेंट
पाकिस्तानी टीव्ही वाहिन्यांचे कार्यक्रम व डोक्युमेंटरी
या आदेशामुळे भारतातील कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाकिस्तानमधून येणारी सामग्री आता पाहायला मिळणार नाही.
२७ एप्रिल रोजी केंद्र सरकारने १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घातली होती. त्यांच्यावर भारत, लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांविरोधात भडकावू व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याचा ठपका होता.
Over 8,000 X accounts banned for spreading pro-Pakistan and fake information, orders to remove Pakistani content from OTT platforms
महत्वाच्या बातम्या
- Operation sindoor वर मोदींचे मॉनिटरिंग; जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले!!
- Operation sindoor : पाकिस्तानात 3 ठिकाणी 9 टार्गेटवर भारताचा क्षेपणास्त्र हल्ला; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला!!
- Devendra Fadnavis : अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Mahadev Jankar : भाजपने विचारले नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली, महादेव जानकारांची खंत