विशेष प्रतिनिधी
चेन्नई : मध्य प्रदेशात 21 बालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले कोल्ड्रिफ’ कफ हे विषारी सिरप बनवणाऱ्या उत्पादक कंपनीचे मालक जी. रंगनाथन यांना चेन्नई इथून अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील सात सदस्यीय पथकाने ही कारवाई केली आहे. Coldriff
हे कफ सिरप ‘स्रेसन फार्मास्युटिकल्स’ या कंपनीने तयार केलं होते. या कंपनीचे मालक जी. रंगनाथन हे ७३ वर्षांचे आहेत. त्यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमधून फार्मसीचं पदवीचं शिक्षण घेतलं आहे. त्यांनी चार दशकांहून अधिक काळ हा व्यवसाय करत आहेत. व्यवसायाच्या सुरुवातीला त्यांनी ‘प्रोनीट’ नावाचं एक पौष्टिक सिरप तयार केलं होतं. १९८० च्या काळात ते चेन्नईमध्ये अतिशय लोकप्रिय झालं होतं.
गर्भवती महिलांसाठी फायदेशीर असल्याचं सांगत बालरोगतज्ञांनाही याचे फायदे सांगितले होते. त्यावेळी हे ‘प्रोनीट’ अतिशय प्रसिद्ध झालं होतं. मात्र नंतर राज्य औषध नियंत्रण विभागाने त्यावर आक्षेप घेत सरकारी परवानगी आवश्यक असल्याचं सांगितलं. रंगनाथन यांनी पुढे आवश्यक त्या परवानग्या मिळवल्या आणि व्यवसाय पुढे चालू ठेवला. यानंतर त्यांनी अनेक लहान-मोठे युनिट्सची निर्मिती केली.
त्यानंतर ते ‘स्रेसन फार्मास्युटिकल्स’चे प्रमुख बनले. हीच कंपनी ‘कोल्ड्रिफ’ कफ तयार करते. त्यांनी तयार केलेल्या धोकादायक कफ सिरीपमुळे निष्पाप बळी गेले. मुलांच्या मृत्यूनंतर या कफ सिरीप कंपनीचं चेन्नई-बंगळूर महामार्गावर असलेलं दोन हजार चौरस फुटांचं उत्पादन युनिट सील करण्यात आलं आहे. तसंच कोडंबक्कम येथील नोंदणीकृत कार्यालयही बंद करण्यात आलं आहे.
Owner of company manufacturing poisonous cough syrup ‘Coldriff’ arrested
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा