विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर प्रतिहल्ला करून माेदी सरकारने पाकिस्तानला धडा शिकविला. मात्र, मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला असतानाही आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले नाही असा गाैप्यस्फाेट माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम म्हणाले, तत्कालीन यूपीए सरकारवर मुंबई हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय दबाव आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या भूमिकेनंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणे टाळलं. माझ्या मनात या हल्ल्याचा बदला घेण्याचा विचार होता, परंतु सरकारने सैन्य कारवाई न करण्याचा निर्णय घेतला असं पी.चिदंबरम यांनी म्हटलं आहे.
पी. चिदंबरम म्हणाले की, मुंबईतील हल्ल्यानंतर काही दिवसांतच मी केंद्रीय गृहमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता. या हल्ल्यात १७५ हून अधिक लोकांचा जीव गेला होता. जगातील अनेक देशांतील अधिकाऱ्यांनी दिल्ली गाठत युद्ध सुरू करू नका असं म्हटलं होते. त्यावेळी काेंडाेलिसा राइस ज्या तत्कालीन अमेरिकन परराष्ट्र मंत्री होत्या, त्यांनी माझी आणि पंतप्रधानांची भेट घेतली आणि प्रत्युत्तर देऊ नका असं सांगितले. मात्र हा निर्णय सरकार घेईल असं मी तेव्हा म्हटलं. आपल्याला बदला घ्यायला हवा असा विचार माझ्या मनात होता. त्यानंतर पुढे पंतप्रधान आणि इतर लोकांशीही संभाव्य कारवाईबाबत चर्चा केली होती असं त्यांनी म्हटलं. तसेच जेव्हा हल्ला सुरू होता, तेव्हाही पंतप्रधानांनी त्यावर चर्चा केली होती. त्यानंतर जो निर्णय झाला त्यावर परराष्ट्र मंत्रालय आणि जागतिक संघटनांचा प्रभाव दिसून येत होता.
२६ नोव्हेंबर २००८ साली लश्कर ए तैय्यबाचे १० दहशतवादी मुंबईत घुसले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ओबेरॉय, ताज हॉटेल, कामा हॉस्पिटल यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला केला. मुंबई पोलिसांनी एका दहशतवाद्याला पकडले. या अजमल कसाबला २०१२ मध्ये फाशी देण्यात आली होती.
पी. चिदंबरम यांच्या विधानानंतर भाजपाने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. मुंबई हल्ल्यानंतर परदेशी दबावामुळे चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले गेले हे देशातील जनता जाणते, आता माजी गृहमंत्र्यांनी १७ वर्षांनी त्याचा स्वीकार केला असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं. चिदंबरम मुंबई हल्ल्यानंतर गृहमंत्रिपद सांभाळण्यासाठी तयार नव्हते. त्यांना पाकिस्तानविरोधात सैन्य कारवाई करायची होती परंतु त्यांच्यावर दबाव होता असा आरोप भाजपा प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केला.
p-chidambaram-exposes-upas-botched-role-on-26-11-attacks-due-to-international-pressure
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!




















