विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवला आहे. गृह मंत्रालयाने याबाबत अधिकृत परिपत्रक जाहीर केले असून, आता एनआयए या प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे.
हल्ल्यानंतर एनआयएचे पथक पहलगाममध्ये कार्यरत असून, त्यांनी घटनास्थळी तळ ठोकला आहे. तपासाची जबाबदारी अधिकृतपणे एनआयएकडे सोपवल्यानंतर, स्थानिक पोलिसांकडून प्राप्त झालेली केस डायरी, एफआयआर व इतर महत्त्वाची कागदपत्रे एनआयएने ताब्यात घेतली आहेत आणि तपास अधिक गतीने सुरू आहे.
या दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा संवेदनशील तपास देशातील प्रमुख दहशतवादविरोधी संस्थेकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. एनआयए हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कट रचणारे सूत्रधार कोण, कोणत्या दहशतवादी संघटना यात सहभागी होत्या, स्लीपर सेलचा संभाव्य धोका किती आहे याचा सखोल शोध घेणार आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर गृह मंत्रालयाला अहवाल सादर केला जाईल.
हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन महत्त्वपूर्ण निर्णय
सुरुवातीला जम्मू-काश्मीर पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र हल्ल्याचे गांभीर्य, त्यामधील मोठा दहशतवादी कट, नागरिकांच्या सुरक्षेची गरज आणि भविष्यातील संभाव्य धोके पाहता गृह मंत्रालयाने तपास एनआयएकडे वर्ग केला आहे.
बैसरन येथे घडलेल्या या हल्ल्यात दहशतवाद्यांनी थेट पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. या अमानुष घटनेत २६ निरपराध पर्यटकांचा बळी गेला. संरक्षण व गुप्तचर यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिल्यानंतर, या हल्ल्याच्या सूत्रधारांना शोधून काढणे आणि कडक कारवाई करणे हे तपास यंत्रणेसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.
Pahalgam terror attack investigation to be handed over to NIA; Home Ministry official announcement
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती