विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला जाेरदार प्रत्यत्तर देत भारताने पाकिस्तानचे सर्वात माेठे बंदर कराची जवळपास उध्वस्त करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या कराची बंदराच्या परिसरात भारताच्या आयएलएस विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर या दोन युद्धनौका तैनात होत्या. पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर या दोन्ही युद्धनौकांनी कराची बंदरावर हल्ला चढवला आहे. कराची बंदरावर अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. त्यामुळे मोठी आग लागली.
पाकिस्तानी नौदलाचे कराची आणि ओरमारा येथे तळ आहेत. जिथे त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांचे मुख्यालय, युद्धनौका आणि पाणबुड्या तैनात आहेत. या दोन नौदल तळांना उद्ध्वस्त करून, आयएनएस विक्रांतने पाकिस्तानी नौदलाला मोठ्या प्रमाणात हादरवून टाकण्यात यश मिळवले आहे.
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला. भारताचे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यामुळे संतापलेल्या पाकिस्तानने बुधवारी मध्यरात्री आणि गुरूवारी भारतावर विमान आणि ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क असलेल्या भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला जमीनीवरून चोख प्रत्युत्तर दिले. अशातच भारताने आयएनएस विक्रांतच्या माध्यमातून पाकिस्तानवर मोठा हल्ला केला आहे.
भारताने हवाई दल, लष्कर आणि नौदल हे तीनही सक्रीय झाले झाले आहेत. पाकिस्तानने आज पुन्हा एकदा एफ-16, जेएफ-17 चे दोन विमान आणि 8 ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने पाकिस्तानचे एफ-16 आणि दोन जेएफ-17 विमानं पाडली, तर भारताच्या एस-400 हवाई सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तानची 8 ड्रोन हवेतच नष्ट करत मोठे नुकसान टाळले आहे. यानंतर आता पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय नौदलाचे वेस्टर्न नेव्हल कमांड सक्रिय झाले होते.
Pakistan Karachi port destroyed, attacked by Indian warships
महत्वाच्या बातम्या
- भारताने 13 देशांना ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली, या ४ मुद्द्यांवर होता फोकस
- Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये जवानांनी २२ नक्षलवाद्यांना केले ठार, १८ जणांचे मृतदेह सापडले
- Singer Adnan Sami : गायक अदनान सामीचा खुलासा- पाकिस्तानी मुले त्यांच्या सैन्याचा तिरस्कार करतात; देश उद्ध्वस्त केल्याचा आरोप
- सिंदूर समर्पणाने श्रद्धांजली : वीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे ललिता सहस्रनाम पूजन आणि सिंदूर वितरण