विशेष प्रतिनिधी
तेहरान : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) अखेर गुढघ्यावर आले आहेत. इराणच्या अध्यक्षांची मध्यस्ती घालून काश्मीर आणि जलसुरक्षा यासारख्या मुद्द्यांवर भारताशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली. शरीफ इराणच्या दौऱ्यावर आहेत. तेहरानमध्ये इराणचे अध्यक्ष मसूद पाझ्श्कियान यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी भारताशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली.
भारतासोबतच्या लष्करी संघर्षा दरम्यान इराणने दिलेल्या पाठिंब्याबद्दल शरीफ यांनी पाझ्श्कियानचे आभार मानले. दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंध आहेत, यावर त्यांनी भर दिला.
पाकिस्तानी पंतप्रधान २५ मे ते ३० मे दरम्यान तुर्की, इराण, अझरबैजान आणि ताजिकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. येथे ते भारतासोबतच्या तणावाबाबत पाकिस्तानची बाजू मांडणार आहेत.
शरीफ २९-३० मे रोजी ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथे होणाऱ्या हिमनद्यांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेलाही उपस्थित राहतील.
शरीफ म्हणाले की, आम्हाला शांतता हवी आहे आणि त्यासाठी आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. आम्ही काश्मीरसह आमचे सर्व प्रश्न संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) ठरावानुसार सोडवू.
सिंधू नदीशी संबंधित मुद्द्यांवर आम्ही आमच्या शेजाऱ्याशी शांततेने चर्चा करण्यास तयार आहोत. जर ते (भारत) गंभीर असतील तर आम्ही व्यापाराला चालना देण्यासाठी आणि दहशतवादाशी लढण्यासाठी चर्चा करण्यास तयार आहोत.
शरीफ यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खेमेनी यांना भारतासोबतच्या अलिकडच्या संघर्षाची माहिती दिली. ते म्हणाले की, पाकिस्तानला नेहमीच या प्रदेशात शांतता नांदावी असे वाटते जेणेकरून आर्थिक विकास होऊ शकेल.
२२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाममध्ये ५ दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली. दुसऱ्या दिवशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ५ मोठे निर्णय घेतले.
यामध्ये, ६५ वर्षे जुना सिंधू जल करार थांबविण्यात आला. अटारी चेकपोस्ट बंद करण्यात आला. व्हिसा निलंबित करण्यात आला आणि उच्चायुक्तांना काढून टाकण्यात आले. सिंधू जल करार थांबविण्यात आल्याने पाकिस्तान संकटात सापडला आहे. Shehbaz Sharif
Pakistan PM Shehbaz Sharif on his knees, ready for talks with India, willing to discuss issues like Kashmir and water security
महत्वाच्या बातम्या
- Economy : अर्थव्यवस्थेत भारताने जपानला टाकलं मागे, आता जर्मनीची वेळ
- Jyoti Malhotras : ज्योती मल्होत्राच्या फोनवरून मोठा खुलासा, पाकिस्तानी युट्यूबरसोबत करत होती काम!
- Lalu Prasad Yadav : बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी मोठी कारवाई
- Mysore Pak : आता ‘म्हैसूरपाक’ नाही ‘म्हैसूर श्री’ म्हणायचं