विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : fire missiles भारताने मध्यम अंतराची बॅलेस्टिक मिसाइल अग्नी ५ ची यशस्वी चाचणी केली आहे. पाच हजार किलाेमीटर मारक क्षमता असलेल्या या अग्नी क्षेपणास्त्रांमुळे पाकिस्तानला धडकी बसली आहे.fire missiles
ओडिशातील चांदिपूर येथील इंटीग्रेटेड टेस्ट रेंज केंद्रात ही चाचणी झाली. पा चाचणीच्या एक दिवसाआधी इस्लामाबादच्या थिंक टँकने अग्नी ५ बाबत पाकिस्तानी सरकारला सतर्कतेचा इशारा दिला होता. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे थिंक टँक स्ट्रॅटेजिक व्हिजन इन्स्टिट्यूटने अग्नी ५ बाबत पाकिस्तानच्या शहबाज शरीफ सरकारसोबतच आर्मी चीफ असीम मुनीर यांना सावध केले होते. SVR ने म्हटलं होते की, जर भारताने या मिसाइलची यशस्वी चाचणी केली तर ती पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा असू शकते. कारण त्याची रेंज ५ हजार किमीहून अधिक आहे. ही मिसाइल भारताच्या इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइल अग्नी ५ चा एक भाग आहे. त्याला भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) विकसित केले आहे. DRDO ने याला अपग्रेड करण्याची योजना बनवली होती, ज्याची मारक क्षमता ७५०० किमीपर्यंत वाढणार आहे असं सांगण्यात येते.fire missiles
गेल्या वर्षी भारताने ‘मिशन दिव्यास्त्र’ अंतर्गत अग्नी-५ ची पहिली MIRV (Multiple Independently Targetable Re-entry Vehicle) चाचणी यशस्वी केली होती. या तंत्रज्ञानामुळे ही शस्त्र प्रणाली अनेक अण्वस्त्रांना तोंड देऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेत सहभागी असलेल्या DRDO शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचे कौतुक केले होते.
अग्नी-५ मिसाइल अनेक युद्धसामग्री वाहून नेण्यास आणि एकापेक्षा जास्त लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहे. ते MIRV तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे म्हणजेच मल्टीपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल रीएंट्री व्हेईकल तंत्रज्ञान. ही क्षमता या मिसाइलला एक धोकादायक शस्त्र बनवते. अग्नी-५ च्या यशस्वी चाचणीमुळे भारताने अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि युनायटेड किंग्डम यांच्या यादीत स्थान मिळवले आहे. ज्यांच्याकडे MIRV-सुसज्ज ICBMs शस्त्रे आहेत.
Pakistan successfully test-fired fire missiles with a range of 5,000 kilometers
महत्वाच्या बातम्या
- Pune Municipal Corporation elections:पुणे महापालिका निवडणूक: आरक्षण सोडत जाहीर, १७३ पैकी ८७ जागा महिलांसाठी राखीव
- कृत्रिम बुद्धीमत्तेच्या लाटेतही यशस्वी होण्याची भारतीयांमध्ये क्षमता, मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- Rohit Pawar alleges Sanjay Shirsat:सिडको भूखंड वाटपात 5000 कोटींचे सरकारी नुकसान, रोहित पवार यांचा संजय शिरसाट यांच्यावर आरोप
- Eknath Shinde : जनतेने वाजवला ब्रँडचा बँड, बेस्ट पतपेढीच्या दारुण पराभवावर एकनाथ शिंदे यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल