विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : भारतीय लष्कराने ७ मे रोजी पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी बुधवारी देशाला संबोधित करत भारताला खुलेआम इशारा दिला. पाकिस्तान सूड घेईल. हे युद्ध शेवटपर्यंत नेले जाईल,” अशा वल्गना त्यांनी केल्या आहेत.
शरीफ म्हणाले, भारताच्या हल्ल्याला आम्ही माफ करणार नाही. आमचं लष्कर आणि नागरिक एकत्र आहेत. पाकिस्तान दहशतवादाचा सर्वाधिक बळी आहे. आम्ही प्रत्येक हल्ल्याचा बदला घेऊ आणि आमच्या शत्रूंना पराभूत करू.
यापूर्वी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीनेही एक निवेदन जारी करत म्हटलं होतं की, “भारतीय हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराला वेळ, ठिकाण आणि पद्धत यांच्या निवडीचा पूर्ण अधिकार दिला आहे.”
शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखालील या समितीच्या बैठकीला मंत्री, लष्करप्रमुख, आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पाकिस्तान सरकारने भारताच्या कारवाईला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणारी युद्धजन्य कृती असे म्हटले आहे.
पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या अनुच्छेद ५१ चा दाखला देत म्हटलं आहे की, “आम्हाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे आणि योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने आम्ही उत्तर देऊ.”
दरम्यान, भारतीय वायुदल आणि लष्कराने केलेल्या अचूक कारवाईत लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनच्या मुख्य तळांवर हल्ले झाले. बहावलपूरच्या मार्कज तैयबा आणि मार्कज सुबहानसह सवाई नाला, गुलपूर, अब्बास, सर्जल आणि महमूना जोया अशा नऊ ठिकाणांचा समावेश आहे.
Pakistan’s aggressive language after ‘Operation Sindoor’; Shahbaz Sharif’s threat to “retaliate to India”
महत्वाच्या बातम्या
- Operation sindoor वर मोदींचे मॉनिटरिंग; जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले!!
- Operation sindoor : पाकिस्तानात 3 ठिकाणी 9 टार्गेटवर भारताचा क्षेपणास्त्र हल्ला; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला!!
- Devendra Fadnavis : अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Mahadev Jankar : भाजपने विचारले नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली, महादेव जानकारांची खंत