विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पहलगाम येथे झालेल्या भीषण हल्ल्यात २६ हिंदू पर्यटकांची हत्या करण्यात आली हाेती. यामध्ये पाकिस्तानचा संबध हाेता हे उघड सत्य असले तरी त्याबाबतचे पुरावे नव्हते. मात्र, ‘द प्रिंट’ या न्यूजपाेर्टलच्या पत्रकार यांनी उघडकीस आणले आहे की अमेरिकेतील नामवंत अंतराळ तंत्रज्ञान कंपनी मॅक्सार टेक्नाॅलाॅजीकडे ( Maxar Technologies) फेब्रुवारी 2025 मध्ये पहलगामच्या उपग्रह प्रतिमांसाठी 12 ऑर्डर्स नोंदवण्यात आल्या हाेत्या. एका पाकिस्तान्याच्या कंपनीकडून या प्रतिमा विकत घेतल्या हाेत्या. जे नेहमीच्या संख्येपेक्षा दुप्पट होते.
‘ द प्रिंट’ने दिलेल्या वृत्तपत्रात म्हटले आहे की, ही मागणी जून 2024 पासून सुरू झाली होती — त्याच कालावधीत Maxar ने पाकिस्तानातील Business Systems International Pvt Ltd (BSI) या भौगोलिक माहिती सेवा देणाऱ्या कंपनीशी भागीदारी केली होती. या कंपनीचा संस्थापक ओबैदुल्ला सैयद हा अमेरिकेतील न्यायालयात अण्वस्त्र संबंधित गैरव्यवहारप्रकरणी दोषी आढळून शिक्षा भोगलेला आहे.ओबैदुल्ला सैयद याने 2006 ते 2015 दरम्यान Pakistan Atomic Energy Commission (PAEC) ला उच्च-कार्यक्षमता संगणक उपकरणे व सॉफ्टवेअर चोरून पाठवले. अमेरिकेतील डिपार्टमेंट ऑफ जस्टिस व ICE (Immigration and Customs Enforcement) ने त्याच्यावर कारवाई करत एक वर्ष व एका दिवसाची शिक्षा ठोठावली होती.
PAEC ही एजन्सी अमेरिकन सुरक्षा दृष्टीने संवेदनशील मानली जाते कारण ती पाकिस्तानचे अण्वस्त्र, क्षेपणास्त्र आणि उच्च-स्फोटक तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम करते. Maxar Technologies ही कंपनी सामान्यतः सरकारी आणि संरक्षण संस्थांना उपग्रह चित्रण सेवा पुरवते. भारतातील संरक्षण मंत्रालय आणि ISRO या दोघीही Maxar च्या ग्राहक आहेत. भारतातील 11 खासगी अंतराळ स्टार्टअप्स देखील Maxar चे भागीदार आहेत.
Maxar ने पाकिस्तानातील BSI या वादग्रस्त कंपनीसोबत भागीदारी करताना योग्य पार्श्वभूमी तपासणी केली नाही, यावर तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. ISRO च्या एका वैज्ञानिकाने सांगितले की, “सुरक्षिततेच्या दृष्टीने हे अतिशय धोकादायक आहे. भारताने अशा कंपन्यांवर दबाव टाकून, पाकिस्तानासारख्या देशांशी असलेली सहकार्य थांबवावी.”
पाहलगामव्यतिरिक्त पुलवामा, अनंतनाग, राजौरी, पूंछ आणि बारामुल्ला या लष्करी दृष्टिकोनातून महत्त्वाच्या भागांनाही प्रतिमा मागवण्यात आल्या होत्या. 30 सेंटीमीटरपर्यंतचे रिझोल्यूशन असलेली चित्रे एक प्रत सुमारे 3 लाख रुपयांना विकली जातात. ही चित्रे सैनिक हालचाली, शस्त्र साठे, चेकपोस्ट्स, घुसखोरी मार्ग यांचे विश्लेषण करण्यासाठी वापरली जातात.
फेब्रुवारी 2025 मध्ये उपग्रह प्रतिमा मागणीचा उच्चांक गाठण्यात आला होता. विशेषतः 12, 15, 18, 21 व 22 तारखांना जास्त मागणी हाेती. मार्चमध्ये कोणतीही मागणी नव्हती. पण 12 एप्रिलला म्हणजेच हल्ल्याच्या 10 दिवस आधी पुन्हा एक प्रतिमा मागवण्यात आली. हल्ल्यानंतर 24 आणि 29 एप्रिललाही प्रतिमा मागवण्यात आल्या. त्यानंतर कोणतीही ऑर्डर नोंदवली गेलेली नाही.
एक माजी लष्करी अधिकारी म्हणाले, “10 सेंटीमीटरपेक्षा कमी रिझोल्यूशनची चित्रे इतकी स्पष्ट असतात की त्यातून रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तींचे चेहरेही ओळखता येतात. Maxar च्या चित्रांची स्पष्टता 30 सें.मी. ते 15 सें.मी. पर्यंत असते.
भारत सरकारचे Remote Sensing Data Policy, Geospatial Guidelines आणि Spacecom Policy या अंतर्गत काही मर्यादा आहेत. मात्र खासगी उपग्रह सेवांच्या अनियंत्रित वाढीमुळे ही धोरणे तोकडी पडत आहेत. सुरक्षित क्षेत्रांसाठी कमी रिझोल्यूशनमध्ये माहिती पुरवली जाते, पण आंतरराष्ट्रीय खासगी कंपन्या कोणालाही विक्री करू शकतात.
Pakistan’s connection in Pahalgam attack exposed, high resolution satellite images taken two months ago were sold
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित