विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : गेल्या दोन दिवसांपासून भारतीय लष्कर देत असलेल्या जोरदार तडाख्यामळे पाकिस्तानने नरमाईची भाषा सुरु केली आहे. पाकिस्तानचे उप-पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी लष्करी संघर्ष थांबवण्याची भूमिका मांडताना “भारताने आक्रमक थांबवायला हवे. जर भारत थांबला, तर आम्हीही थांबू. आम्ही युद्धाच्या बाजूने नाही. आम्हाला विनाकारण विध्वंस आणि पैशांची नासाडी नको आहे, असे म्हटले आहे
पाकिस्तानकडून सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या हवाई हल्ल्यांना भारताने ९-१० मेच्या रात्री जबरदस्त उत्तर दिले. भारताने पाकिस्तानी हवाई दलाच्या तळांसह शस्त्र गोदामावरही प्रहार केला. त्यानंतर आता पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांची भाषा बदलली आहे.
पाकिस्तानातील जियो न्यूजला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल भाष्य केले आहे. पाकिस्तानचे उप-पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले, भारताने एनसीए अर्थात नॅशनल कमांड अथॉरिटीची थांबवायला हवे. जर भारत थांबला, तर आम्हीही थांबू. आम्ही युद्धाच्या बाजूने नाहीये. आम्हाला विनाकारण विध्वंस आणि पैशांची नासाडी नकोय. पाकिस्तानने फक्त स्वःसंरक्षणासाठी ही पावले उचलली आहेत. अशावेळी भारत थांबला तर परिस्थिती पुन्हा सुधारू शकते.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी एनसीए अर्थात नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक बोलावल्याचे वृत्त समोर आले होते. हे वृत्त पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी फेटाळून लावले आहे. नॅशनल कमांड अथॉरिटीबद्दलच्या बैठकीबद्दल पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, अशी कोणतीही बैठक सध्या होणार नाहीये. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने एनसीएची २००० मध्ये स्थापना कऱण्यात आली होती. एनसीएचे इस्लामाबाद मुख्यालय असून, पाकिस्तानातील संरक्षण आणि अण्वस्त्र धोरणाबद्दल महत्त्वाची भूमिका या संस्थेची आहे.
Pakistan’s soft language: If India stops the attack, we will also stop it ishak dar
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित