विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत शाश्वत उर्जेच्या क्षेत्रात मोठे पाऊल टाकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ सप्टेंबर रोजी आसाममधील गोलाघाट जिल्ह्यातील नुमालीगढ येथे देशातील पहिल्या बांबू-आधारित इथेनॉल बायो-रिफायनरीचे उद्घाटन करणार आहेत. हे अत्याधुनिक प्रकल्प नुमालीगढ रिफायनरी लिमिटेड (NRL) या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (IOCL) उपकंपनीने उभारले असून राज्य सरकारचे २६ टक्के हिस्सेदारी आहे. PM Modi
सुमारे ५,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारलेला हा प्रकल्प हरित उर्जा, बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करणे या उद्दिष्टांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा प्रकल्प आसाम बायो इथेनॉल प्रायव्हेट लिमिटेड (ABEPL) द्वारे चालवला जाणार असून NRL आणि फिनलंडमधील दोन कंपन्या Fortum BV आणि Chempolis Oy यांच्यातील संयुक्त उद्यम आहे.
ही रिफायनरी लिग्नोसेल्युलोसिक बायोमास म्हणजे प्रामुख्याने बांबू वापरून इथेनॉल तयार करेल. अशा प्रकारच्या इथेनॉलला दुसऱ्या पिढीचे (2G) इथेनॉल म्हटले जाते. यामुळे अन्नधान्याऐवजी अपशिष्ट पदार्थांचा वापर होतो.
1G इथेनॉल ऊस, मका, गहू अशा अन्नधान्य पिकांपासून बनते. 2G इथेनॉल: काडीकचरा, बांबू, उसाची पाचट यांसारख्या लिग्नोसेल्युलोसिक बायोमासपासून बनते. 3G इथेनॉल: समुद्री शैवाल (algae) व तत्सम स्रोतांपासूनतयार होते. 4G इथेनॉल: जनुकीय तंत्रज्ञान आणि सिंथेटिक बायोलॉजीवर आधारित उत्पादन.आहे.
रिफायनरीची वैशिष्ट्ये म्हणजे दरवर्षी ५ लाख टन बांबू प्रक्रिया होऊन ४८,९०० टन इथेनॉल उत्पादन होईल. पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिश्रण साध्य करण्यास हातभार लागेल. १९,००० टन फर्फुरल, ११,००० टन ऍसिटिक ऍसिड, ३१,००० टन फूड ग्रेड CO₂ उत्पादन होणार आहे. उरलेल्या पदार्थांपासून २५ मेगावॅट वीज उत्पादन, त्यापैकी २० मेगावॅट स्वतःच्या वापरासाठी व ५ मेगावॅट रिफायनरीसाठी पुरवठा होऊ शकतो. उपउत्पादनांमध्ये एन्झाईम्स, फॉर्मिक ऍसिडसुद्धा समाविष्ट आहे.
ही रिफायनरी थेट ३,००० शेतकऱ्यांकडून बांबू खरेदी करणार आहे. ईशान्य भारतात देशातील ६६% बांबू साठा आहे. पेपर मिल्स बंद झाल्यानंतर बांबूचा मोठ्या प्रमाणात वापर कमी झाला होता. या प्रकल्पामुळे बांबूला नवे औद्योगिक बाजारपेठ मिळणार असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे.
या बायो-रिफायनरीने आधीच ९९.७% शुद्ध बांबू इथेनॉल तयार करून तांत्रिक क्षमता दाखवून दिली आहे. त्यामुळे व्यावसायिक उत्पादनाची तयारी पूर्ण असून आसामातील बांबू संपत्तीचा योग्य वापर होणार आहे.
PM Modi inaugurates country’s first bamboo-based ethanol bio-refinery
महत्वाच्या बातम्या
- Yogesh Kadam : ठाकरे बंधुंचे मराठी मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरणार ; योगेश कदम
- round of 11th admission : अकरावी प्रवेशाची विशेष फेरी, चार महिन्यांनंतरही संपेना प्रवेश प्रक्रिया
- ward structure in Pune : पुण्यातील प्रभाग रचनेवर विरोधक व नागरिकांचा रोष !
- Manoj Jarange : ओबीसी समाजाला मिळाले दुष्ट विचारांचा नेता, मनोज जरांगे यांचा हल्लाबोल